Sunday, September 13, 2026
Homeचंद्रपूररोटाव्हेटरमध्ये अडकून मजुराच मृत्यू; शरीराचे झाले तुकडे- आजची घटना..

रोटाव्हेटरमध्ये अडकून मजुराच मृत्यू; शरीराचे झाले तुकडे- आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-गोठ्यात ठेवलेल्या रोटाव्हेटर मधील माती काढत असतांना रोटाव्हेटरमध्ये अडकून एका मजुराचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना आज,बुधवारी सकाळी कोरपणा तालुक्यातील लखमापूर गावात घडली.
कोरपना तालुक्यातील लखमापूर भोयेगाव मार्गावर ट्रॅक्टर मालक-चालक रवींद्र गोपळ वडस्कर यांचा गोठा आहे.गोठ्यात त्यांनी ट्रॅक्टर ठेवलेला होता.सध्या धान कापणीला वेग आल्याने धान कापणी होताच
रोटाव्हेटरच्या हंगामी कामास सुरूवात होते.त्यासाठी वडस्कर यांनी आज,बुधवार १६ ऑक्टोंबरच्या सकाळी रोटाव्हेटरची सफाई करण्यासाठी रमेश शामराव टेकाम वय ४५ वर्षे, रा.लखमापूर यांना रोटाव्हेटर मधील अडकुन असलेली माती काढण्यास सांगितले.माती काढत असतांना चालकाने ट्रॅक्टर सुरू केला.ट्रॅक्टर सुरू करताच रमेश टेकाम हा रोटाव्हेटर मध्ये ओढला गेला.बघता-बघता टेकाम यांच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले.यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती गडचांदूर पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील यादी गावपातळीवर प्रसिद्ध.. – गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’च्या दुसऱ्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील ३ हजार ६१० शेतकरी पात्र ठरले आहेत.पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा...

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!