- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-एका युवकाने झाडाला दोर बांधून गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची घटना आज,शनिवार दिनांक-२१ सप्टेंबरला साकोली शहरातील न्यायालय चौकात उघडकीस आली.मृताचे नाव उमेश्वर सूर्यभान वाघाडे वय ३८ वर्षे, मांगली/किटाडी असे आहे.
साकोली शहरातील टी-पॉइंट गोवर्धन चौकात बालोद्यान असून करंजीच्या झाडावर सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मांगली/किटाडी येथील उमेश्वर वाघाडे झाडावर चढला.त्याने तेथे लागलेल्या बॅनरच्या चौकटीचा दोर आपल्या गळ्यात लावून गळफास लावला.घटना लक्षात येताच महामार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा केली.घटनेची माहिती मिळताच साकोलीचे ठाणेदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रशांत वडूले घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी झाडावरून मृतदेह उतरवून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
माहितीनुसार,मृताचे लग्न २०१७ ला झाले होते.परंतु, मुलबाळ नव्हते.काही दिवसांपूर्वी सेंदरवाफा येथे बहिणीकडे आला होता.तो मानसिक तणावात राहात असल्याची माहिती आहे.मृताने घटनास्थळी झाडाखाली कापडी पिशवी आणि चप्पल काढून ठेवली होती.आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही.शहरात रहदारीच्या चौकात सर्वांच्या समोर एका व्यक्तीने गळफास लावल्याची ही साकोली शहरातील पहिलीच घटना आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडूले करीत आहेत.
- Advertisement -

