Monday, August 31, 2026
Homeदेसाईगंजदुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटून अपघात; होमगार्ड जवानाचा जागेवरच मृत्यू...

दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटून अपघात; होमगार्ड जवानाचा जागेवरच मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या किन्हाळा-मोहटोला वरून पूर्वेस शिरपूर मार्ग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे.सदरचा मार्ग सायंकाळ झाली की,रहदारीसाठी पूर्णतः बंद स्वरूपात असतो.रात्रीच्या सुमारास एखादे वाहन पंक्चर वा अपघात झाल्यास कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी ठावठिकाणा नसतो.असाच प्रकार काल,रविवारी उघडकीस आला आहे.काल,रविवारी सकाळी मोहटोला व विहीरगाव येथील युवक व्यायामाकरिता गेले असता,त्यांना रस्त्यावर अपघात झाल्याचे दिसून आले.जवळ जाऊन बघितले असता,पळसाच्या झाडाच्या फांद्या तुटून युवकावर पडल्या होत्या व दुचाकी वाहन बाजूला पडून होते.दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटून वाहन रस्त्यालगत पळसाच्या झाडावर आदळले असावे; असा अंदाज वर्तविण्यात आला.देवेंद्र श्यामराव देवरे वय ३५ वर्षे मु.वासी ता.कुरखेडा असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.तो कुरखेडा पोलिस ठाणे अंतर्गत गृहरक्षक(होमगार्ड) दलाचा जवान होता.सदरचा
अपघात शनिवार, १४ सप्टेंबरच्या रात्री देसाईगंज तालुक्यातील मोहटोला -किन्हाळा-शिरपूर मार्गावर महाजन डोंगरी परिसरात झाला.व्यायाम करण्याकरिता गेलेल्या युवकांनी सदर अपघाताची माहिती देसाईगंज पोलिस स्टेशनला दिली.एमएच ३३,एल-४००३ या क्रमांकाची दुचाकी घटनास्थळावरच पडून होती. देसाईगंज पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आणि प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले.या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार राजेंद्र मोहुर्ले करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!