Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरखाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मॅनेजरने केली मारहाण.. - कर्मचारी संघटनांमध्ये तीव्र संताप..

खाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मॅनेजरने केली मारहाण.. – कर्मचारी संघटनांमध्ये तीव्र संताप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर येथील वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या कोळसा खाणीत काल, शनिवारी रात्री खाणीत काम करणाऱ्या कामगाराला मॅनेजरने मारहाण केली.माईनिंग सरदार संकल्प कुंभारी यांना अंडरग्राउंड मॅनेजर बालकृष्ण जारपाला यांनी जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.या घटनेमुळे कर्मचारी संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त करून कर्मचाऱ्यांनी खाणीत काम बंद केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,शनिवारी दुसऱ्या पाळीतील काम सुरू असताना अंडरग्राउंड मॅनेजर बालकृष्ण जारपाला यांनी माईनिंग सरदार संकल्प कुंभारी यांना मारहाण केली.त्यांनी मद्यप्राशन करून मारहाण केल्याचा आरोप होत आहे.या मारहाणीत संकल्प कुंभारी गंभीर जखमी झाला असून,त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच इतर कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी मॅनेजरला जाब विचारण्याचा प्रयत्न केला,मात्र जारपाला यांची आक्रमकता कमी झाली नाही.या प्रकारानंतर खाणीत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद केला आहे.या आंदोलनामुळे वेस्टर्न कोलफील्ड्सच्या खाणीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कनिष्ठ कर्मचाऱ्याला मारहाण करणे हे अत्यंत निंदनीय असून,या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!