Wednesday, June 24, 2026
Homeदेसाईगंजशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे संविधान मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न...

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे संविधान मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यातील ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थापैकी देसाईगंज आयटीआय मध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण महामहीम जगदीप धनखड उपराष्ट्रपती भारत सरकार यांच्या शुभहस्ते आभासी पद्धतीने (ऑनलाइन पद्धतीने) करण्यात आला.
आज,१५ सप्टेंबर हे आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचे औचित्य साधून भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असल्यामुळे या विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून सदर संविधान मंदिर युवकांना आणि भारतीय नागरिकास प्रेरणादायी ठरणार आहे.देसाईगंज आय.टी.आयला प्रमुख उपस्थिती म्हणून आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार  कृष्णा गजबे हे आवर्जून उपस्थित  होते.भारतीय संविधान या विषयावर विजय बन्सोड (राज्य उपाध्यक्ष दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) संविधान हा प्रत्येक भारतीयाचा व बहुजनांचा अभिमानाचा पवित्र ग्रंथ आहे,संविधानातील अधिकार व कर्तव्य,स्वातंत्र्य, समता व बंधुता,राज्य व देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सदुपयोग होत आहे; असे अमूल्य विचार युवकांना व सर्वांना प्रेरणादायी ठरेल असे सांगितले.संविधान समितीतील २९९ सदस्यांपैकी समिती अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद (प्रथम राष्ट्रपती),शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे भविष्य ओळखून सदर संविधानाचा गाभा तयार केला आहे. त्यामुळे देश विकसित राष्ट्रांच्या दिशेने वाटचाल करीत आहे.संविधानाची जाण असणारे सुनील पारधी (ओबीसी सेल भाजपा तथा तालुकाध्यक्ष देसाईगंज), दोनाडकर, सूर्यभान सेलोटे ओबीसी समाज प्रतिनिधी अनिल कुमरे सर (एस.टी.समाज प्रतिनिधी), डाकराम वाघमारे (एस.सी.समाज प्रतिनिधी),आशिष घुटके,(समाजसेवक) केशव डाबरे (सर्वसाधारण प्राचार्य आश्रम आयटीआय कोरची) या कार्यक्रमाचे अध्यक्ष देसाईगंज औद्योगिक संस्थेचे प्राचार्य सुरेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात पार पडला.सोहळा यशस्वी करण्याकरिता रविकांत गोतमारे (गटनिदेशक),माया जाधव (गटनिदेशिका),विष्णू नागमोती (गटनिदेशक), चंद्रशेखर गरमळे (एन.एस.एस.समन्वयक) यांनी संचालन केले.कू.पुनम ठाकरे(एन.एस.एस. स्वयंसेविका)हिने आभार प्रदर्शन केले,तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गुणवंत वांढरे (मुख्य लिपिक), आदर्श भोले,चंदू समर्थ,राकेश भोयर,बादल घरडे,मेघा चौदंते,क्षमा बोंद्रे,खुशाल उमक,भरत नैताम,रवींद्र निखाडे,राहुल कराडे,नीलिमा भडके सह संस्थेतील सर्व निदेशक,कर्मचारीवृंद तसेच प्रशिक्षणार्थ्यांनी संविधान मार्गदर्शनाचा लाभ घेत सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!