Tuesday, July 14, 2026
Homeभंडाराग्राहक मंचाच्या आदेशाची अवहेलना प्रकरणी माजी नगरसेवक तुरुंगात…-ग्राहकांशी गैरव्यवहार करण्याचा प्रकार; तक्रारदारास दोन...

ग्राहक मंचाच्या आदेशाची अवहेलना प्रकरणी माजी नगरसेवक तुरुंगात…-ग्राहकांशी गैरव्यवहार करण्याचा प्रकार; तक्रारदारास दोन कोटी रुपये देण्याचे आदेश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-सदनिका विक्रीच्या माध्यमातून ग्राहकांशी गैरव्यवहार करण्याचा प्रकार एका माजी नगरसेवकाला चांगलाच अंगलट आला आहे.जिल्हा ग्राहक मंचच्या आदेशावरून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे,तक्रारदारास दोन कोटी रुपये देण्याचे आदेश ग्राहक मंचने दिले आहेत.याच माजी नगरसेवकाला अशाच एका प्रकरणात ग्राहक मंचाने तीन वर्षाची शिक्षा सुनावल्याची माहिती आहे.नितीन रामचंद्र धकाते असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे.

भंडारा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक नितीन धकाते यांनी खोकरला भागात साई वात्सल्य अपार्टमेंट या बहुमजली इमारतीचे बांधकाम हाती घेतले.एका अपार्टमेंटमध्ये ९ सदनिका तयार करण्याची परवानगी असतानाही १२ सदनिका तयार करून त्या १२ लोकांना विकण्याचा प्रताप त्याने केला.१६ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या अपार्टमेंटचे काम अजूनही अपूर्णच आहे.

सदनिका विकत घेण्यासाठी पैसे देणाऱ्या ग्राहकांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहकांनी या माजी नगरसेवकाला पैसे परत मागणे सुरू केले.परंतु,पैसे परत देत नसल्यामुळे या ग्राहकांनी जिल्हा ग्राहक मंचात प्रकरण दाखल केले.काहींनी वैयक्तिक, तर काहींनी सामूहिक प्रकरणे दाखल केली.अशी चार प्रकरणे त्याच्याविरुद्ध ग्राहक मंचात आहेत.

यातील सुमित कपूर यांच्या प्रकरणात या माजी नगरसेवकाला तीन वर्षाचीशिक्षा ठोठावण्यात आली होती.जानेवारी २०२३ रोजी जिल्हा ग्राहक मंचने आदेश दिले होते.परंतु,अटके संदर्भात पोलिसांकडून टाळाटाळ केली जात असल्याने ग्राहक मंचने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले होते.अन्य १४ व्यक्तींच्या प्रकरणांमध्ये जिल्हा ग्राहक मंचाने १८ टक्के व्याजासह दोन कोटी रुपयांची रक्कम ग्राहकांना परत करावी; असा आदेश दिला आहे.मात्र,या आदेशाचे पालन न केल्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट काढला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!