Monday, August 31, 2026
Homeनागपूरअखेर दारूच्या नशेत टल्ली असणारा वैद्यकीय अधिकारी निलंबित…

अखेर दारूच्या नशेत टल्ली असणारा वैद्यकीय अधिकारी निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तीन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे लोकार्पण होत असताना शुक्रवारी नरखेड तालुक्यातील मोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण उमरगेकर यांनी कार्यालयीन वेळेत दारू ढोसल्याने मृत्यूशी झुंज देत असलेल्या महिलेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत.कर्तव्यावर असताना दारू प्याल्याचे आढळून आल्याने डॉ.प्रवीण उमरगेकर यांना निलंबित करण्यात आले आहे.

डॉक्टर दारू प्याल्याने महिलेवर वेळीच उपचार झाले नाही.या प्रकारामुळे मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याबाबत होती.दरम्यान,काल शनिवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य समीर उमप व सलील देशमुख यांनी दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.यावर प्रशासनाने प्रवीण उमरगेकर यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली.यावेळी सदस्यांनी त्यांच्या सर्कलमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातील काही दिवस डॉक्टर उपस्थित राहात नसल्याचे म्हटले.

मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे.डॉ.मयूर बोपचे यांच्याकडे या प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार असून,डॉ.प्रवीण उमरगेकर हे दुसरे वैद्यकीय अधिकारी आहेत.

दोन्ही वैद्यकीय अधिकारी आपल्या सोयीने तीन-तीन दिवस कर्तव्य बजावतात.शुक्रवारी उमरगेकर यांची ड्यूटी असताना ते दारू प्याले असल्याने विष प्राशन केलेल्या महिलेवर उपचार करता आले नाही.या घटनेमुळे संतप्त लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात गोंधळ घातला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!