उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):- झाडीपट्टी नाट्य रंगभुमीच्या अनेक नामवंत नाट्य कलावंतांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातुन ग्रामिण भागातिल ज्वलंत समस्या समाजा समोर मांडुन समाज प्रबोधनाचे कार्य केले.मात्र उतरत्या वयात नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे वयाचे ५० वर्षे पुर्ण झालेल्या नाट्य कलावंतांना नियमित मानधन मिळावे; असे मत प्रसिद्ध नाट्य लेखक,निर्माता दिग्दर्शक जयदेव उर्फ राजु माटे यांनी व्यक्त केले. झाडी पट्टी रंगभुमिवर पंख तुटले पक्षिनीचे,पवित्र गंगा इश्काची,कस्तुरीच्या केसात भांग अत्तराचा,सख्या मदन पेटला उरी,सदा बाईवर फिदा,बांधलं बाईनं घुंगरु वाजलं पाटलाच डमरु,इज्जत विकली बाळासाठी अश्या विविध नाट्य लेखनाद्वारे नवोदित कलावंतांना नाट्य क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध करुन देणारे ख्यातनाम नाट्य लेखक,दिग्दर्शक निर्माता जयदेव उर्फ राजु माटे म्हणाले की,झाडीपट्टी नाट्य क्षेत्रातिल कलावंत पुणे,मुंबईच्या नाट्य अकॅडमीतील प्रशिक्षित कलावंतांनाही भुरळ पडेल असे अभिनय करतात.परिसरातिल समस्यांचे सादरीकरण करुन सातत्याने समाज प्रबोधन करीत असतात.पुणे,मुंबई सारख्या ठिकाणी नाट्यगृह उपलब्ध असल्याने त्या भागातील कलावंतांना नियमित सादरीकरण करुन आपली आजिविका भागविणे सोपे होते.याउलट झाडीपट्टी नाट्य क्षेत्रात नाट्यगृह उपलब्ध नसल्याने ग्रामिण भागात आयोजित केलेल्या नाट्य प्रयोगावरच आपले उदरनिर्वाह करावे लागते आहे.त्यातही पुणे मुंबईचे कलावंत टिव्ही सिरियल किंवा एखाद्या चित्रपटात काम केल्याचा उपापोह करुन मजल मारुन जातात. त्यामुळे झाडीपट्टी नाट्य कलावंतांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागतो आहे.नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कलावंतांच्या मानधनाचे अर्ज शासन दरबारी प्रलंबित असुन,त्यांना जीवन जगणे सोयीचे होईल; यासाठी शासनाने ५० वर्ष पुर्ण केलेल्या नाट्य कलावंतांना नियमित मानधन द्यावे;असे मत जयदेव उर्फ राजु माटे यांनी व्यक्त केले आहे.

