Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरतीन महिन्यांसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी राहणार बंद…

तीन महिन्यांसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी राहणार बंद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 चंद्रपूर :- जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये आज,१ जुलैपासून तीन महिण्यांसाठी पर्यटन बंद करण्यात आले आहे.काल कोअरझोनमध्ये वाघ,वाघिणी व अन्य वन्यप्राण्यांच्या दर्शनासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. शेवटच्या दिवशी सोनम वाघीण आणि तिच्या ३ बछड्यांनी पर्यटकांना मनसोक्त दर्शन दिले.त्यामळे पर्यटकही यामुळे भारावले. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघ व अन्य वन्यप्राण्यांच्या पर्यटनासाठी प्रसिध्द असे स्थळ आहे.दरवर्षी पावसाळ्यात तीन महिण्याकरीता कोअरझोनमधील पर्यटकांसाठी बंद ठेवले जाते.आज सोमवार पासून कोअर भागात होणारे पर्यटन बंद करण्यात आले.१ जुलै पासून ३० सप्टेंबरपर्यंत हा पावसाचा काळ असतो.त्यामुळे पर्यटन बंद ठेवले जाते.वन्यजीवांच्या प्रजनन काळात कुठलाही व्यत्यययेऊ नये; शिवाय पावसामुळे अंतर्गत भागातील रस्त्यांनी पर्यटन वाहने जाण्यास अडचणी निर्माण होतात.परिणामी दुर्घटनेला सामोरे जावे लागते. त्यामुळे कोअर झोनमधील क्षेत्र पर्यटनाकरीता बंद ठेवण्यात येते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!