Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरपोलीस कोठडीतील गळफास प्रकरणी ३ पोलीस कर्मचारी निलंबित…

पोलीस कोठडीतील गळफास प्रकरणी ३ पोलीस कर्मचारी निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- प्रसिद्ध आनंदवनातील एका २४ वर्षीय तरुणीच्या निघृण हत्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने पोलीस कोठडीच्या बाथरूममध्ये आत्महत्या केली.या घटनेने पोलिस प्रशासन हादरले असून पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी ३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने एकूणच हे प्रकरण चर्चेचा विषय ठरू लागला आहे.पोलिस हवालदार धनंजय वरगंटीवार,महिला पोलिस हवालदार मनीषा कुत्तरमारे व पोलिस शिपाई नितीन तुराळे असे निलंबन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आनंदवनात आरती चंद्रवंशी या तरुणीची प्रेमप्रकरणातून हत्या करणारा आरोपी समाधान माळीने बुटाच्या लेसने वरोरा पोलिस ठाण्याच्या कोठडीत असताना आत्महत्या केल्याची घटना काल,रविवार दि.३० जून ला सकाळच्या  सुमारास उघडकिस आल्यावर ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली.समाधानला ७ दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली होती.त्याच्यावर देखरेख ठेवण्याची जवाबदारी धनंजय,मनीषा व नितीन वर होती.ती योग्य रीतीने पाळण्यात आली नाही. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये समाधान जोड्यांची लेस काढतांना दिसतो आहे.त्याची नोंद या तिघांनी घेतली नाही आणि अनर्थ घडला.त्या ३ कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले.पुढील चौकशी करून अहवाल येई पर्यंत निलंबन कायम राहील; असे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन म्हणाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!