Friday, October 16, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील आठवड्याचे उत्कृष्ट कवी उपेंद्र रोहनकर…

गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील आठवड्याचे उत्कृष्ट कवी उपेंद्र रोहनकर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

 गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते.पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते. 

या उपक्रमाचे सव्विसावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २७  कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली जिल्ह्यातील कवी उपेंद्र पत्रूजी रोहनकर यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “थोडं बोलायला शिक” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

 उपेंद्र रोहनकर हे सोनापूर कॉम्प्लेक्स,गडचिरोली  येथील रहिवासी असून सेवानिवृत्त शिक्षक व ज्येष्ठ कवी आहेत.त्यांचे ‘डोळस हो’ कवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर असून अनेक चारोळ्या,अलक व कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे.अनेक वृत्तपत्रांतून त्याच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत.ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे प्रा.‌अरुण बुरे, दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सव्विसावे सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने अजय राऊत, प्रिती ईश्वर चहांदे,नरेंद्र गुंडेली,मिलींद खोब्रागडे,रंजना चुधरी,वंदना सोरते,अतुल गंडाटे,उपेंद्र रोहनकर, संगीता ठलाल,रेखा दिक्षित,रोशन येमुलवार,गणेश रामदास निकम,जयराम घोंगडे,डॉ.चंद्रकांत लेनगुरे, तुळशीराम उंदीरवाडे,विलास जेंगठे,रोहिणी पराडकर, सोनाली रायपुरे,अशोक मांदाडे,पुनाजी कोटरंगे,सुरेश गेडाम,संजय बन्सल,प्रियंका वाकडे,गजानन गेडाम, पुरुषोत्तम लेनगुरे,मधुकर दुफारे,सुजाता एन.अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार चुडाराम बल्हारपुरे(नाटककार), गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!