Tuesday, August 11, 2026
Homeचंद्रपूरपूर्वपरवानगी न घेता शहरात भित्तीपत्रके लावणे एका दवाखान्याला भोवले…-महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्या अंतर्गत...

पूर्वपरवानगी न घेता शहरात भित्तीपत्रके लावणे एका दवाखान्याला भोवले…-महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्या अंतर्गत ठाण्यात तक्रार दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- शहरात विना परवानगी भित्तीपत्रके लावणाऱ्या नवशक्ती आयुर्वेदीक दवाखानाविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र.एक कार्यालयाद्वारे शुक्रवारी शहर पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शहरातील जटपुरा गेट तसेच छोटा बाजार चौक रोड परिसरातील भिंतींवर,विविध शासकीय व खाजगी परिसरात नवशक्ती आयुर्वेदीक दवाखान्याची जाहिरात करणारे स्टीकर्स,भिंतीपत्रके मनपाकडून पूर्वपरवानगी न घेता लावले असल्याचे,सहाय्यक आयुक्त यांना बुधवारी दि.२६ जून रोजी पाहणीदरम्यान आढळुन आले.संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले होते.मात्र भिंतीपत्रके न काढल्याने नवशक्ती आयुर्वेदीक दवाखाना यांच्यावर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा अंतर्गत फौजदारी गुन्हा 

नोंद करण्यात यावा; अश्या आशयाची तक्रार करण्यात आली.जाहिरात करण्यास अश्या प्रकारचा अवलंब केल्याने शासकीय निधीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.तसेच शहर सुशोभीकरणाच्या कामातही बाधा निर्माण होते.विना परवाना पत्रके लावल्याने झालेल्या तक्ररीची माहिती होताच शहरात एकच खळबळ उडाली आहे.आता पोलिस काय कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!