Sunday, April 19, 2026
Homeदेसाईगंज३२ वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू…-देसाईगंज तालुक्यातील घटना…

३२ वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू…-देसाईगंज तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या गिट्टीच्या ढिगावरून ट्रॅक्टर जाऊन नियंत्रण सुटल्याने ३२ वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाल्याची घटना काल,शनिवारी २९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.अविनाश शनिराम ठाकरे वय ३२ वर्षे रा.चोप,ता.देसाईगंज असे अपघातात ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

चोप गावातील रहिवासी असलेल्या अविनाश ठाकरे हे गावातील नीती आयोगाच्या अंतर्गत सुरू असलेल्या तलावातील गाळ काढण्याच्या कामावर जात असतांना मुख्य डांबरीकरण मार्गावर समोरून येणाऱ्या ट्रक ला साईड देण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या मुख्य मार्गा लगत असलेल्या गीट्टीच्या ढीगाऱ्यावरून ट्रॅक्टर चालवीत असताना नियंत्रण सुटले.नियंत्रण सुटल्याने अविनाश सुरू असलेल्या ट्रॅक्टर खाली कोसळला त्यात समोरील चाक व मागील ट्रॉलीचे चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.याबाबत गावकऱ्यांना माहिती मिळताच लगेच घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस प्रशासन देण्यात आली.पोलीस प्रशासनाने घटनास्थळ गाठून मोका पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

महत्वाचे म्हणजे,चोप ते कोरेगावपर्यंत दीड किलोमीटर अंतराचे काम जानेवारी महिन्यात सुरू झाले.रस्त्याच्या कडेला गीट्टी व इतर साहित्य पडून असल्याने अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने चोप येथील पत्रकार गौरव नागपूरकर यांनी अनेकदा रस्त्याचे काम लवकरात-लवकर करण्यात यावे; याकरीता अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.मात्र,तक्रारींकडे दुर्लक्ष केल्या गेले. अशातच आता काल,मोठी दुर्घटना घडल्याने संबंधित कंत्राटदाराला कामात दिरंगाई केल्या प्रकरणी काळ्या यादीत टाकून तरुणाच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा; अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!