Thursday, June 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपतीची दारू सोडविण्याचा मंत्र्याने महिलांना दिला गजबचा सल्ला….

पतीची दारू सोडविण्याचा मंत्र्याने महिलांना दिला गजबचा सल्ला….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- मध्य प्रदेशचे सामाजिक न्याय मंत्री नारायण सिंह कुशवाह यांनी महिलांना अजब सल्ला दिला आहे. व्यसनमुक्तीसाठी घरातील माता-भगिनींना पुढे यावे लागेल,असे ते म्हणाले.बायकांनी पतींना घरी दारू प्यायला सांगावी म्हणजे हळूहळू लाजेमुळे दारू पिणे बंद होते.कुशवाह यांनी काल,शुक्रवारी भोपाळमध्ये व्यसनमुक्ती अभियानांतर्गत जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवला.यावेळी ते म्हणाले की,दारूबंदी होऊनही दारू पिणारे राजी नाहीत.त्यामुळे या मोहिमेद्वारे लोकांना दारूपासून मुक्ती मिळू शकते. यामध्ये घरातील माता-भगिनींना सर्वात मोठे योगदान द्यावे लागणार आहे.जर पत्नीची इच्छा असेल तर ती आपल्या पतीला दारू पिणे बंद करू शकते.यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या पतीला समजावून सांगावे लागेल की,बाजारातील दारू पिण्यापेक्षा घरीच प्या.मग जेव्हा तो घरात बायको किंवा मुलांसमोर दारू पितो तेव्हा त्याला लाज वाटू लागते.त्यांना हेही सांगा की,त्यांच्या वडिलांना पाहिल्यानंतर मुलेही मोठी होतील आणि दारू पिऊ लागतील.हे ऐकून पतींना हळूहळू लाज वाटेल आणि ते दारू पिणे सोडन देतील.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!