Monday, August 10, 2026
Homeचंद्रपूर२७ वर्षीय महिलेने आपल्या ९ महिन्याच्या मुलाला विष पाजून स्वतः घेतला गळफास…

२७ वर्षीय महिलेने आपल्या ९ महिन्याच्या मुलाला विष पाजून स्वतः घेतला गळफास…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.)येथील २७ वर्षीय महिलेने आपल्या ९ महिन्याच्या मुलाला विष पाजून स्वतः गळफास घेवून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना काल,शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.पल्लवी मितेश पारोधे वय २७ वर्षे असे मृत मातेचे नाव असून स्मित मितेश पारोधे हे बाळ चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,वरोरा तालुक्यातील शेगाव बु.येथील पारोधे कृषी केंद्राचे संचालक नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपुर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील पल्लवी विनोद ढोके या युवतीसोबत रितिरिवाजाप्रमाणे लग्न झाले.त्यांना ९ महिन्याचा स्मित नावाचा मुलगा आहे.काल शुक्रवार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मितेश पारोधे यांचा ९ महिन्याचा मुलगा घरात बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत पडलेला होता.तर पत्नी पल्लवी ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.सदर घटनेची माहिती शेगाव पोलिसांना देण्यात आली.

ठाणेदार योगेंद्र सिंह यादव यांनी,तात्काळ घटनास्थळ गाठले आणि पंचनामा करीत पत्नी पल्लवीचा मृत्तदेह ताब्यात घेतला.तर ९ महिन्याच्या बाळाला तात्काळ वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले.त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले.महिलेचे जीवन संपवण्याचे कारण अद्यापही कळू शकलेले नाही.या घटनेचा पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस करित आहेत.

मुलगी पल्लवी हिने जीवन संपवले नसून सासरच्या लोकांनी तिची हत्याच केली आहे; असा गंभीर आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी केला.त्यांनी या विषयी शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.वडीलांच्या तक्रारीवरून पल्लवीच्या मृत्यूस जबाबदार धरून शेगाव पोलीसांनी पती नितेश पारोधे व दीर रितेश पारोधे या दोघांना अटक केली आहे. पती व दीराच्या चौकशीनंतर पल्लवी हिच्या मृत्यूचे कारण पुढे येणार आहे.मात्र महिलेने जीवन संपवले की तीची कुणी हत्या केली याचा शोध मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर शेगाव पोलीसांनी सुरू केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!