उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-गडचिरोली जिल्ह्यातील प्रभावी आदिवासी नेते छगन शेडमाके यांची ऑल इंडीया आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी नियुक्ती केली आहे.
मुंबई येथिल टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस च्या आदिवासी सेल ची बैठक पार पडली.या प्रसंगी ऑल इंडिया कॉंग्रेस आदिवासी सेलचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे सह महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस आदिवासी सेलचे अध्यक्ष सुरेश चिंचोळकर यांचेसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या प्रसंगी आदिवासी बहुल भागात कॉंग्रेसच्या वाढिसह जनसामान्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या छगन शेडमाके यांची प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.छगन सेडमाके यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शासन व प्रशासनाकडे सातत्याने प्रयत्न केले.एवढेच नव्हे तर पुरग्रस्त शेतकरी,वादळाने प्रभावित झालेले नागरिक यांना वेळोवेळी मदत करण्यासह शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व इतर अनेक अशी भरीव कामगिरी केली.या कामांची दखल घेत निष्ठावान कार्यकर्त्याचा सन्मान म्हणून प्रदेश कमेटीच्या सर्व सदस्यांनी छगन शेडमाके यांच्या नावाची शिफारस ऑल इंडीया कॉंग्रेस कमेटी आदिवासी सेलचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांचेकडे केली.मोघे यांनी मुंबई च्या टिळक भवनातील आयोजित बैठकित महाराष्ट्र कॉंग्रेस आदिवासी सेल च्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती केल्याचे नियुक्ति पत्र प्रदान केले आहे.छगन शेडमाके यांनी नियुक्तिचे श्रेय कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह सर्व आदिवासी कॉंग्रेसचे नेते तसेच कार्यकर्ते यांना दिले आहे.

