Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीपाऊस येऊन झाला बेपत्ता; वातावरणात पुन्हा वाढला उकाडा…-पेरण्या पावसाअभावी संकटात…

पाऊस येऊन झाला बेपत्ता; वातावरणात पुन्हा वाढला उकाडा…-पेरण्या पावसाअभावी संकटात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- पावसाने काही दिवस हजेरी लावून अनेकांना उकाड्यापासून दिलासा दिला होता.पाऊस पडल्याने शेतीच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांनी जोमाने सुरू केली.अशातच आता पाऊस माघारी फिरला असल्याचे सर्वत्र चित्र दिसू लागले आहेत. पावसाने फक्त नावापुरता झलक दाखवित दडी मारल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचा जीवही कासावीस झाला आहे. हवामान खात्याने पाऊस पडण्याचा दिनांक- २८ जून पर्यंत गडचिरोली, चंद्रपूर,भंडारा,गोंदिया,नागपूरसह वर्धा जिल्ह्यात यलो अलर्टचा  इशारा दिला आहे. दरम्यान आतापर्यंत व सध्या तरी पावसाची चिन्हे दिसत नाहीत.आकाशात दररोज ढग जमतात आणि पाठ फिरवून निघून जातात.जिल्ह्यात निम्मा जून महिना व मृग नक्षत्र कोरडा गेल्यावर पावसाचे आगमन झाले. दोन तीन दिवस चांगला पाऊस झाल्याने आता त्यात सातत्य राहील; अशी अपेक्षा होती.परंतु,ती फोल ठरली.पाऊस येऊन बेपत्ता झाल्याने वातावरणात पुन्हा उकाडा वाढला आहे.सकाळपासून टळटळीत उन पडत आहे.लोकांच्या घरातील कूलर अद्यापही लावलेलेच आहे.जून हा पावसाळ्याचा महिना मानला जातो.मात्र,जून महिना संपण्याच्या बेतात आहे. तरीसुद्धा पावसाचा जोर नाही.त्यामुळे खरीप हंगामातील कामे लांबणीवर पडली आहेत.ज्यांनी चार दिवसांच्या पावसाच्या भरोश्यावर पेरण्या केल्या त्या पावसाअभावी संकटात सापडल्या आहेत. उकाड्यामुळे गरमी व आरोग्याच्या समस्या पुन्हा निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे पाऊस केव्हा पडणार याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!