Sunday, July 12, 2026
Homeमुंबईछगन शेडमाके यांची महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी नियुक्ती….

छगन शेडमाके यांची महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी नियुक्ती….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-गडचिरोली जिल्ह्यातील प्रभावी आदिवासी नेते छगन शेडमाके यांची ऑल इंडीया आदिवासी कॉंग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी नियुक्ती केली आहे.

मुंबई येथिल टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस च्या आदिवासी सेल ची बैठक पार पडली.या प्रसंगी ऑल इंडिया कॉंग्रेस आदिवासी सेलचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे सह महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस  आदिवासी सेलचे अध्यक्ष सुरेश चिंचोळकर यांचेसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या प्रसंगी आदिवासी बहुल भागात कॉंग्रेसच्या वाढिसह जनसामान्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या छगन शेडमाके यांची प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.छगन सेडमाके यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शासन व प्रशासनाकडे सातत्याने प्रयत्न केले.एवढेच नव्हे तर पुरग्रस्त शेतकरी,वादळाने प्रभावित झालेले नागरिक यांना वेळोवेळी मदत करण्यासह शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व इतर अनेक अशी भरीव कामगिरी केली.या कामांची दखल घेत निष्ठावान कार्यकर्त्याचा सन्मान म्हणून प्रदेश कमेटीच्या सर्व सदस्यांनी छगन शेडमाके यांच्या नावाची शिफारस ऑल इंडीया कॉंग्रेस कमेटी आदिवासी सेलचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांचेकडे  केली.मोघे यांनी मुंबई च्या टिळक भवनातील आयोजित बैठकित महाराष्ट्र कॉंग्रेस आदिवासी सेल च्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती केल्याचे नियुक्ति पत्र प्रदान केले आहे.छगन शेडमाके यांनी नियुक्तिचे श्रेय कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसह सर्व आदिवासी कॉंग्रेसचे नेते तसेच कार्यकर्ते यांना दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कळलेय भावा? अवैध दारू बंद कां होत नाही तर.. – दारू पुरवठा करणाऱ्यांना मिळतोय ठेका; वाचा संपूर्ण करून कहाणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारू बंदीचा धिंडोरा पिटण्यात येत आहे.पण, खरोखरच दारू बंद झाली काय?आज कित्येक गावांमध्ये देशी,विदेशी, गावठी मोहफुलाची दारू व थंडगार...

प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर मर्यादा; ग्रामीण अर्थचक्र मंदावले.. – ग्रामपंचायत निवडणुका पुढल्याच वर्षी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवा,यासाठी सरकारने माजी सरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक केली आहे.त्यानुसार,माजी सरपंच...

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!