Friday, May 1, 2026
Homeगडचिरोलीबोगस बियाणे,खते विक्री करतांना निदर्शनास आल्यास परवाना रद्द…-गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कृषि निविष्ठा...

बोगस बियाणे,खते विक्री करतांना निदर्शनास आल्यास परवाना रद्द…-गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कृषि निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील बियाणे,खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्यात आलेला आहे. शेतकरी,कंपनी प्रतिनिधी,बियाणे,खते व किटकनाशके विक्रेते व नागरिकांनी त्यांच्या तक्रारी संबंधात सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७  या वेळेत भ्रमणध्वनी क्रमांक- ८२७५६९०१६९ तसेच टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क साधावा; तसेच आपल्या तक्रारी किंवा अडचणी dsaogad15@gmail.com / adozpgad@gmail.com या इमेलवर पाठविण्याचे आवाहन कृषि विकास अधिकारी प्रदीप तुमसरे यांनी केले आहे.

बियाणे व खते यात बोगस कंपन्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये; याची काळजी कृषी विभागामार्फत घेतली जात आहे. तसेच युरिया खत ज्यादा दराने विक्री केल्याचे व युरिया सोबत इतर अनावश्यक खते लिंकिंग करीत असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा मोहीम अधिकारी,कृषि विभाग,आनंद पाल यांनी कळविले आहे.

प्रदीप तुमसरे,कृषि विकास अधिकारी,जि.प. गडचिरोली👇

जिल्हास्तरावर १ व तालुकास्तरावर प्रत्येकी १ असे जिल्ह्यात एकूण १३ भरारी पथके स्थापन केलेले आहेत; बोगस बियाणे,खते विक्री करतांना निदर्शनास आल्यास परवाना रद्द करण्यात येईल व कायदेशीर कार्यवाही केली जाईल,यासाबंधित कृषी विभागाचे पथक बारीक लक्ष ठेऊन आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!