Wednesday, October 7, 2026
Homeमुंबईमुसळधार पावसाचा फटका; झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू..

मुसळधार पावसाचा फटका; झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत झाड कोसळण्याच्या घटना सुरूच असल्याने यंदाच्या पावसाळ्यात झाड कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे.अश्यातच आज, रविवार ५ जुलै रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास मुंबईच्या कुर्ला पश्चिम येथील नौपाडा परिसराच्या कमानी भागातील गोम्स गाऊन बिल्डिंग,हिंदी बीएमसी शाळेजवळील दुकानावर झाड कोसळून एका ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.युनूस कुंदावाला(शेख)असे या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दमदार पावसाने मुंबईच्या विविध परिसरात अनेक ठिकाणच्या रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले आहे. पावसामुळे झाडांना पकडुन असणारी माती वाहू लागल्याने उभी असलेली झाडे उन्मळून पडू लागलीत. अश्याच प्रकारे आज दुपारच्या सुमारास कुर्ला(पश्चिम) येथील नौपाडा परिसरात एक झाड अचानक शेजारील दुकानावर पडला.झाड पडल्याचे निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.दुर्घटनेत दुकानात असलेले युनूस कुंदावाला हे गंभीर जखमी झाले.दरम्यान,गंभीर जखमी झालेल्या कुंदावाला यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या फौजिया रुग्णालयात हलवण्यात आले.मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशामक दल, स्थानिक पोलीस प्रशासन,बेस्टचे कर्मचारी आणि महापालिकेच्या वॉर्ड स्टाफने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ झाडाच्या फांद्या कापून बाजूला करण्याचे काम सुरू केले.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पावसामुळे दुर्घटना घडून मृत पावल्याची ही तिसरी घटना आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!