Saturday, June 13, 2026
Homeचंद्रपूर'तू जादूटोणा करतोस..! असे म्हणीत वृद्धा ची केली हत्या..

‘तू जादूटोणा करतोस..! असे म्हणीत वृद्धा ची केली हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात जादुटोण्याच्या संशयावरून एका वृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना उजेडात आली आहे.पोलिसांनी या प्रकरणी ३ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.३ महिन्यांपूर्वी याच गावात एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह २ मुलींची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली होती हे विशेष.

पोलिसांच्या माहितीनुसार,आसाराम दोनाडकर वय ६७ वर्षे असे मृत वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.दोनाडकर हे गावात जादुटोणा करतात असा गावातील काही जणांना संशय होता.या संशयातून एक जमाव काल, गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास आसाराम दोनाडकर यांच्या घरावर चाल करून गेला.तिथे त्यांच्याशी तू जादूटोना करतो म्हणून त्यांच्याशी वाद घातला आणि आसाराम यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात आसाराम बेशुद्ध पडले.

या घटनेनंतर आसाराम दोनाडकर यांना तातडीने लगतीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी मौशी गावात धाव घेऊन ३ आरोपींना अटक केली.अटक करण्यात आलेल्यांत संतोष जयघोष मैद वय २६ वर्षे,श्रीकांत जयघोष मैद वय २४ वर्षे व रुपेश देशमुख वय ३२ वर्षे यांचा समावेश आहे.

अंधश्रद्धेतून झालेल्या या हत्याकांडामुळे अवघा चंद्रपूर जिल्हा हादरला आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे मौशी गावातच ३ महिन्यांपूर्वी एक भयंकर हत्याकांड घडले होते.त्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह पोटच्या २ मुलींना कुऱ्हाडीचे घाव घालून ठार केले होते.या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच गुरुवारी रात्री हे हत्याकांड घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!