Sunday, July 26, 2026
Homeदेसाईगंजअनेक ओबीसी बांधव घरकुल योजनेपासून वंचित - ओबीसी बांधवांकडून इतर योजनेची मागणी....

अनेक ओबीसी बांधव घरकुल योजनेपासून वंचित – ओबीसी बांधवांकडून इतर योजनेची मागणी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- अनेक गरजू कुटुंबातील ओबीसी बांधव घरकुल योजनेपासून वंचित असल्याने इतर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांप्रमाणेच ओबीसी समाजातील बांधवांकरिता विशेष वेगळी  घरकुल योजना सुरू करण्यात यावी.अशी मागणी ओबीसी समाजाकडून जोर धरू लागली आहे.

शासनातर्फे अनुसूचित जाती,जमाती,एनटीव्हीजे साठी वेगवेगळ्या प्रकारच्या घरकुल योजना सुरू आहेत.अशातच विविध समाजातील एकंदरीत वेगवेगळ्या जाती-धर्मातील नागरिकांकरिता केवळ पंतप्रधान आवास योजना कार्यान्वित असल्याने पाहिजे त्या प्रमाणात ओबीसी प्रवर्गातील गोरगरीब व गरजू कुटुंबातील नागरिकांना घरकुलाचे लाभ मिळत नाही.राज्यात व जिल्ह्यात सर्वाधिक संख्या ओबीसी समाजाची आहे.गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यामध्ये ६० टक्के ओबीसी बांधव वास्तव्यास आहेत.ओबीसी समाजातील अनेक कुटुंबातील सदस्य केवळ पंतप्रधान आवास योजना सुरू असल्याने घरकुलाचे लाभापासून वंचीत असल्याचे कळते.काही घरकुल योजनांमध्ये पुन्हा-पुन्हा घरकुलाचे लाभ दिल्या जात असल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत.मात्र ज्यांनाअतिआवश्यक आहे.अशा लाभार्थ्यांना घरकुलाचे लाभ दिले जात नाही.ग्रामीण भागातील अनेक ओबीसी बांधव अजूनही घरकुलाचे लाभ मिळण्याच्या आशेवरच जीवन जगत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.

यासाठी शासन स्तरावरून ओबीसी समाजातील गोर-गरीब व गरजू कुटुंबातील सदस्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवा याकरिता पंतप्रधान आवास योजने व्यतिरिक्त विशेष वेगळी इतर योजना सुरू करावी अशी मागणी केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!