Saturday, June 27, 2026
Homeभंडाराखाजगी फायनान्स कंपनीने कर्जदाराच्या घराला ठोकले कुलूप.....! - मुलीच्या लग्नासाठी घेतले होते...

खाजगी फायनान्स कंपनीने कर्जदाराच्या घराला ठोकले कुलूप…..! – मुलीच्या लग्नासाठी घेतले होते कर्ज

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

भंडारा :- खासगी फायनान्स कंपनीकडून मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज परत करण्यास उशीर झाल्याने फायनान्स कंपनीने चक्क कर्जदाराच्या घराला कुलूप ठोकले. सदर प्रकार मोहाडी तालुक्यातील खडकी येथे मंगळवारी दुपारी घडला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खासगी फायनान्स कंपन्या कर्जवसुलीसाठी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात, याची प्रचीती खडकी येथे आली.

खडकी येथील बाबू गणपत वहिले यांनी मुलीच्या लग्नासाठी व व्यवसाय करण्यासाठी महिंद्रा फायनान्स कंपनीकडून पाच वर्षांपूर्वी तीन लाखांचे कर्ज घेतले होते. व्यवसाय बुडाल्याने आहे.कर्ज थकीत झाले. कर्ज फेडण्यास उशीर झाल्याने महिंद्रा फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्यांनी ही अत्यंत निष्ठुर कारवाई केली.कर्ज फेडण्यास आणखी मुदत देण्यात यावी, तसेच लावलेले कुलूप उघडण्यात यावे;अशी बाबू वहिले यांची विनंतीही धुडकावून लावण्यात आली.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या राहत्या घराला चक्क कुलूप ठोकून सील लावले.तसेच दरवाजावर नोटीस लावली.फायनान्स कंपन्या कर्ज देताना मोठे आमिष दाखवतात.मात्र कर्जाचा एक हप्ता थकला तरी घराला सील ठोकतात.याप्रकरणी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!