उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :-जुलमी इंग्रज सत्तेच्या विरोधात बंड पुकारुन जल, जंगल,जमिन सत्याग्रहाच्या माध्यमातुन आदिवासींचे संघटन उभारुन इंग्रजांना सडो की पडो करुन सोडणारे महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांचा शहीद दिन ९ जुन रोजी देसाईगंजच्या तुकुम वार्डात पार पडला.या प्रसंगी रामदास मसराम,अनिल उईके,राजरतन मेश्राम,वासुदेव जुमनाके,सराटे शिक्षक, प्रभाकर बावने,अक्षय सडमाके,राकेश राखडे,उमेश उईके,खुशाल कोडापे यांचेसह तुकुम वार्डातिल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थ्त होते.
प्रसंगी बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहतांना रामदास मसराम म्हणाले की,विर बिरसा मुंडा यांनी वयाच्या १४ व्या वर्षी आदिवासी समाजाचे संघटन उभारुन जुलुमी इंग्रज सत्तेच्या विरोधात बंड पुकारले होते.या देशातिल जल,जंगल,जमिनीवर आदिवासी व या देशातिल मुल निवासींचा अधिकार असुन यावर कोणत्याही शासन व्यवस्थेने अधिकार गाजवु नये; यासाठी त्यांनी लढा उभारला. वयाच्या २५ व्या वर्षी भगवान बिरसा मुंडांना विर मरण आले.त्यांचे कार्य सदैव प्रेरणादायी असुन समाज बांधवांनी त्यांच्या विचारांची प्रेरणा घ्यावी; असे विचार रामदास मसराम यांनी व्यक्त केले.

