Wednesday, September 23, 2026
Homeचंद्रपूर'कांटा लगा गाणे म्हणत' ठाणेदाराने तरुणाला केली अमानुष मारहाण…-गावकऱ्यांनी गाठले एस पी...

‘कांटा लगा गाणे म्हणत’ ठाणेदाराने तरुणाला केली अमानुष मारहाण…-गावकऱ्यांनी गाठले एस पी कार्यालय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- कोरपना पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप एकाडे यांनी ८ जून रोजी पोलिस ठाण्यात विपुल मुनावत नामक २८ वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण केली.याबाबत गावकऱ्यांनी पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची आज,१० जून रोजी भेट घेत त्यांच्याकडे ठाणेदार एकाडे यांची तक्रार केली.

कोरपना तालुक्यातील तांडा क्रमांक-१ मध्ये ठाणेदार एकाडे हे पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेत रमेश मुनावत यांच्या घरी अवैध दारू असल्याच्या संशयावरून गेले होते.त्यावेळी घरी अल्पवयीन मुलगी होती.रमेश मुनावत यांचे पुतणे विपुल मुनावत यांनी ठाणेदार यांना सांगितले की,घरी कुणी नाही.त्यानंतर ठाणेदार यांनी विपुलच्या घरी दारूचा शोध घेतला; मात्र हाती काहीही लागले नाही.त्यावेळी ठाणेदार एकाडे यांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून विपुलला पोलिस स्टेशनमध्ये बोलावले. त्यानुसार विपुल ८ जून रोजी पोलिस स्टेशनमध्ये गेला.

त्यावेळी ठाणेदार एकाडे यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.त्याच्या हाता-पायासह पाठीवर पट्ट्याने मारहाण केली.विशेष म्हणजे मारहाण करताना पोलिस निरीक्षक संदीप एकाडे हे ‘कांटा लगा गाणे म्हणत’ मारहाण करीत होते; अशी ऑडिओ क्लिप पुढे आली आहे.विपुल ठाणेदार याला विनवणी करीत होता.मात्र त्याचे काही न ऐकता अमानुष मारहाण सुरू होती.तू दवाखान्यात गेला तर पुन्हा मारणार अशी धमकीही ठाणेदार यांनी यावेळी दिली.मात्र गावकऱ्यांना हा प्रकार कळताच त्यांनी आज,१० जून रोजी दुपारी १२ वाजता पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची भेट घेतठाणेदार एकाडे यांच्यावर कारवाई करावी; अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!