Wednesday, September 23, 2026
Homeगोंदियामोठी बातमी...गोंदिया; मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात…-१ ठार तर १७ जखमी..

मोठी बातमी…गोंदिया; मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात…-१ ठार तर १७ जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- हैदराबादहून मध्यप्रदेशातील लांजीकडे मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सला आज,सोमवारी दिनांक-१० जून रोजी गोंदिया-गोरेगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोरेगाव तालुक्यातील मिलटोली गावाजवळ भीषण अपघात झाला.या घटनेत १ मजूर ठार, तर १७ जण जखमी झाले. जखमींपैकी ११ जणांची प्रकृती गंभीर आहे.

थानसिंग यादव वय ३०, रा.रेलवाडी जि.बालाघाट, मध्यप्रदेश असे मृताचे नाव आहे.या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ट्रॅव्हल्स चालक मोहित उमाप्रसाद किरसान (रा.उगली / शिवनी म.प्र.)यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार,हैदराबादवरून ५० ते ६० मजुरांना घेऊन हैदराबादहून लांजीकडे जाणाऱ्या पायल ट्रॅव्हल्सच्या चालकाचे मिलटोली परिसरात ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटले.त्यानंतर बस रस्त्यालगतच्या राईस मिलच्या मजुरांच्या क्वार्टरला धडकली.त्यात चालकासोबत कॅबिनमध्ये बसेले १२ जण जखमी झाले.त्यांना गोंदिया स्थित केटीएस सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!