Wednesday, August 12, 2026
Homeभंडाराचक्क पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल…-भंडारा जिल्ह्यात उडाली खळबळ…

चक्क पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल…-भंडारा जिल्ह्यात उडाली खळबळ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- भंडारा येथील पोलिस उपविभागीय अधिकारी बागुल यांच्यावर एका तरुणीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांनी तिला शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केला असून अधिकाऱ्याविरोधात भंडारा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.पीडित तरुणी लाखनी तालुक्यातील दगडी/कन्हेरी येथील रहिवासी आहे.लाखनी तालुक्यातील एक तरुणी नागपूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती.तिथे तिची ओळख एका तरुणासोबत झाली.ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.प्रेमात दोघांनीही आणाभाका घेतल्या.काही वर्षांनंतर तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.तरुणीला त्याच्यावर संशय आला.त्यामुळे तिने लग्नासाठी गळ घातली.त्यावेळी त्याने तिला नकार दिला.खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला.मात्र सुदैवाने ती बचावली.त्यानंतर तिने प्रियकराविरोधत तक्रार करण्याचा धाडसी निर्णय घेतला.तरुणी त्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली असता भंडारा उपविभागीय पोलिस अधिकारी बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले.तरुणीला पोलिस अधिकाऱ्याचा उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली.त्यावेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली.या प्रकारामुळे खचून गेलेल्या तरुणीने सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांना भेटून घडलेला सर्व प्रकार सांगितला.परमानंद मेश्राम यांनी या तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांची भेट घेतली.अखेर तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकारी बागुल यांच्या विरोधात ३५४ अ, ५०९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२० हजाराची लाच घेतांना वनक्षेत्र सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात; तर उपस्थित दोन वनरक्षकही ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राच्या राजुली सहवन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या परसटोला येथील राउंड ऑफिसमध्ये गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)पथकाने २० हजाराची...

येत्या ६० दिवसांत हटविण्यात येणार महामार्गांवरील ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी महामार्गाच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदेशीर ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत म्हणजेच...

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!