Sunday, August 9, 2026
Homeगडचिरोलीघोट येथील विपणन निरीक्षकास अटक..-धान आणि बारदाणा खरेदीत ६ कोटी रुपयांचा अपहाराचे...

घोट येथील विपणन निरीक्षकास अटक..-धान आणि बारदाणा खरेदीत ६ कोटी रुपयांचा अपहाराचे प्रकरण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या धान खरेदीत ६ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी एका कर्मचाऱ्यास अटक केली आहे.राकेश सहदेव मडावी वय ३४ वर्षे, असे संशयीत आरोपीचे नाव असून,तो महामंडळाच्या घोट येथील कार्यालयात विपणन निरीक्षक पदावर कार्यरत आहे.

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा (कं) येथील धान खरेदी केंद्रावर पणन हंगाम २०२२-२३ मध्ये धान आणि बारदाणा खरेदीत ६ कोटी २ लाख ९३ हजार ८४५ रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी ६ जूनला आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार आणि मार्कंडा (कं) खरेदी केंद्राचे तत्कालिन केंद्रप्रमुख व्यंकटी बुर्ले यांना अटक केली. या दोघांच्या चौकशीअंती अपहारात विपणन निरीक्षक राकेश मडावीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही काल ७ जून रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड,उपनिरीक्षक सरिता मरकाम, बालाजी सोनुने यांनी ही कारवाई केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!