Wednesday, August 12, 2026
Homeचंद्रपूरदोन बछड्यांसह जुनाबाई वाघिणीची मौज-मस्ती…

दोन बछड्यांसह जुनाबाई वाघिणीची मौज-मस्ती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जुनाबाई वाघीण तिच्या दोन बछड्यांसह मौज-मस्ती करीत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.मागील सहा दिवसांपासून हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जुनाबाई पुन्हा चर्चेत आली आहे.ताडोबात वाघ आणि वाघिणीच्या मौज मस्तीचा विषय नवीन नाही.यापूर्वी उन्हाच्या तडाख्याने आपल्या बछड्यांसह जलाशयात बसून असलेल्या वाघिणीचा व्हिडीओही यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.त्यानंतर आता ताडोबाला भेट देणाऱ्या नागपूरच्या पर्यटकानी जुनाबाई वाघिणीची दोन बछड्यांसह मौजमस्तीचा व्हिडीओ समाज माध्यमावर सार्वत्रिक केला आहे. पर्यटक कल्पक डोर्लीकर यांनी हा व्हिडीओ चित्रबद्ध केला असल्याचे समजते.ताडोबात जुनाबाई ही वाघीण गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.जुनाबाई व तिचे पिल्ले पर्यटकांना मनसोक्त दर्शन देत आहेत.कल्पक हा ताडोबात सफारी करीत असताना जुनाबाई दोन बछड्यांसह दिसली.जुनाबाई बछड्यांसह मोजमस्ती करीत होती. अशातच जंगलात तारेच्या कुंपणवरून उडी घेऊन पिल्लांना सोबत घेत ती जंगलात फेरफटका मारत दूरवर निघून जाते.हा व्हिडीओही समाज माध्यमावर चांगलाच सार्वत्रिक झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२० हजाराची लाच घेतांना वनक्षेत्र सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात; तर उपस्थित दोन वनरक्षकही ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राच्या राजुली सहवन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या परसटोला येथील राउंड ऑफिसमध्ये गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)पथकाने २० हजाराची...

येत्या ६० दिवसांत हटविण्यात येणार महामार्गांवरील ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी महामार्गाच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदेशीर ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत म्हणजेच...

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!