Friday, September 25, 2026
Homeभंडाराराखीव वनात सरपंचाने केले अतिक्रमण..-तहसीलदाराने दिले चौकशीचे आदेश…

राखीव वनात सरपंचाने केले अतिक्रमण..-तहसीलदाराने दिले चौकशीचे आदेश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- तुमसर तालुक्यातील आंबागड क्षेत्रातील वनविभागाच्या भूमापन क्रमांक- ५७३, खाते क्रमांक- १०२०५ येथील शासकीय झुडपी जंगल राखीव वनात बघेडाचे सरपंच वसंत हरीराम तरटे यांनी पदाचा दुरुपयोग करून ५ वर्षांपासून ०.४० हेक्टर आर मध्ये अतिक्रमण केले आहे.त्यांनी या जमिनीवर ट्रॅक्टरने चिखलनी करून धान पिकाची लागवड केली आहे. त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी शारदा जाधव आणि वनविभागाचे जिल्हा उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गर्रा बघेडा येथील शेतकरी कृष्णा अडगुळकर, धनराज ठाकूर,विनोद सोनवाने व पं.स.चे सदस्य राजेश ठाकूर यांच्या मौकास्थळी पंचनामा करून स्थानिक शेतकऱ्यांच्या बायान नोंदवले जाणार असल्याची माहिती तहसीलदार व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली आहे.महाराष्ट्र जमीन महसूल १९६६ चे कलम ५३,५४ (अ) आणि भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६,३३,६३ व वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९२७ कलम ३४ अव वनसंवर्धन अधिनियम १९८० कलम २ अन्वये अतिक्रमणधारक सरपंच वसंत हरीराम तरटे यांच्यावर कारवाई करून महसूल अतिक्रमण कायदाअंतर्गत शासन नियमानुसार सरपंच पदावरून अपात्र करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.त्यामुळे गर्रा बघेडा गावात खळबळ माजली आहे.याप्रकरणी तुमसरच्या तहसीलदरांनी तालुका मंडळ अधिकारी आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना तातडीने प्रत्यक्ष मौकास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहे.त्यामुळे आता येथे संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणत्या प्रकारे तपास केले जाणार हे काही दिवसांत कळणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!