Friday, August 28, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपुरात अवकाळी पावसाचे आगमन -विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस..

चंद्रपुरात अवकाळी पावसाचे आगमन -विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- मागील काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे.जणू काही सूर्य आग ओकत आहे. या दरम्यान चंद्रपूरमध्ये आज दुपारच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाचे आगमन झाले. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला अचानक आलेल्या पावसाने चंद्रपुरात अनेकांची धावपळ उडाली.

गेले आठवडाभर वाढत्या तापमानाने चंद्रपूरकर त्रस्त होते.दरम्यान राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. या अंदाजानुसार आज दुपारी अचानक ढगांची दाटी होत विजांच्या कडकडाटासह चंद्रपुरात पावसाला सुरुवात झाली.अचानक सर्वत्र अंधारल्याने महामार्गावरील वाहनांना देखील हेडलाईट लावून मार्गक्रमण करावे लागले.या पावसाने चंद्रपुरात वाढत्या तापमानापासून नागरिकांना मात्र जरा दिलासा मिळाला.

चंद्रपुरात तापमान ४० अंशाच्या वर गेले आहे.अशातच आज दुपारच्या सुमारास झालेल्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या पावसानानंतर उकाड्यात प्रचंड वाढ होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. शिवाय अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांकडून कामांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर प्रत्यक्ष प्रवास करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.महामार्गावरील उर्वरित...

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!