Thursday, August 27, 2026
Homeभंडाराअन् प्रवाशाचा धावत्या बसमध्येच झाला मृत्यू…

अन् प्रवाशाचा धावत्या बसमध्येच झाला मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

तुमसर(भंडारा) :- ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य एसटी महामंडळाचे आहे, परंतु या ब्रीदवाक्याला सोमवारी हरताळ फासला गेला.गोंदिया-तुमसर- भंडारा या बसमध्ये देव्हाडी येथून एक प्रवासी बसमध्ये चढला. तुमसर शहराच्या वेशीवर त्याला भोवळ आली. तो बेहोष पडल्यावर त्याच्या दोन साथीदारांनी सदर बस रुग्णालयात नेण्याची विनंती बसवाहकाला केली.परंतु त्यांनी न ऐकता वाद घातला व बसस्थानकात बस नेली. त्यानंतर सहकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून, चालक, वाहकांना काळीज आहे की नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

धावत्या बसमध्ये मृत पावलेल्या तरुणाचे नाव चुनीलाल राऊत वय ३४ वर्षे असे असून,तो डोंगरला येथील रहिवासी आहे.चुनीलाल हे सोमवारी कामठी येथून रेल्वेने देव्हाडी रेल्वे स्थानकात रात्री ८:३० वाजता पोचले.त्यानंतर ते देव्हाडी येथून गोंदिया तुमसर भंडारा बस क्रमांक एम.एच.४० एन. ९२४२ ने तुमसर येथे प्रवासाकरिता बसले.दरम्यान लोटन पोहा मिल येथे बस पोचल्यावर त्यांना भोवळ आली. याबाबत त्यांनी त्यांच्या ओळखीचे उमेश शिवणकर व सचिन शिवणकर यांना सांगितले.या दोन्ही मित्रांनी बसच्या वाहकाला बस रुग्णालयात मृतक चुनीलाल तत्काळ नेण्याची विनंती केली.परंतु चालक व वाहकाने जबरदस्तीने बसगाडी तुमसर बसस्थानकात नेली. बसस्थानक येईपर्यंत चुनीलाल यांची प्रकृती अधिक ढासळली.बसस्थानकावर चुनीलाल यांच्या मित्रासोबत चालक व वाहकांनी वाद घातला.त्यानंतर दोन्ही मित्रांनी एका दुचाकीवरून चुनीलाल यांना रुग्णालयात नेले.तिथे डॉक्टरांनी चुनीलाल हे मृत झाल्याचे जाहीर केले. चुनीलाल राऊत यांच्या मृत्यूची बातमी डोंगरला येथे सोमवारी रात्री पोहोचल्यावर डोंगरला येथील अनेक नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात व तुमसर बसस्थानकात मोठी गर्दी केली होती. संबंधित वाहक आणि चालकावर गुन्हे नोंदविण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष शंकर राऊत यांनी कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!