Wednesday, June 3, 2026
Homeचंद्रपूरखेळण्यात दंग असणाऱ्या सातवर्षीय बालिकेवर बिबट्याने केला हल्ला….

खेळण्यात दंग असणाऱ्या सातवर्षीय बालिकेवर बिबट्याने केला हल्ला….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

बल्लारपूर(चंद्रपूर) :- बल्लारपूर शहरातील श्रीराम वॉर्डात सोमवारी एका बालकाला वानराने गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असताना काल,बुधवारी दिनांक- १३ मार्च रोजी सकाळी ८ वाजता कारवा मार्गावरील पंडित दीनदयाल वॉर्डातील आपल्या अंगणात खेळणाऱ्या सातवर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला.या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.साफिया इकबाल शेख असे जखमी बालिकेचे नाव आहे.

पंडित दीनदयाल वॉर्डातील साफिया शेख ही बालिका अंगणात खेळत होती.हा परिसर कारवा जंगलाला लागून आहे.खेळण्यात दंग असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला.दरम्यान, काही लोकांना बिबट दिसल्याने त्यांनी आरडाओरड केला.आवाजाने बालिकेला सोडून देऊन बिबट्याने जंगलात धूम ठोकली.हल्ल्यात साफिया शेख ही गंभीर जखमी झाली.तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे,वन कर्मचारी कोमल घुगलोत व पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.सदर परिसरात कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले.बल्लारपूर पेपर मिलचा बांबू स्टॉक यार्ड व दीनदयाल वॉर्ड परिसरात सदर बिबट काही दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला.मात्र यावर त्वरित वनविभागाने आळा घालावा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!