Thursday, October 22, 2026
Homeचंद्रपूरखेळण्यात दंग असणाऱ्या सातवर्षीय बालिकेवर बिबट्याने केला हल्ला….

खेळण्यात दंग असणाऱ्या सातवर्षीय बालिकेवर बिबट्याने केला हल्ला….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

बल्लारपूर(चंद्रपूर) :- बल्लारपूर शहरातील श्रीराम वॉर्डात सोमवारी एका बालकाला वानराने गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असताना काल,बुधवारी दिनांक- १३ मार्च रोजी सकाळी ८ वाजता कारवा मार्गावरील पंडित दीनदयाल वॉर्डातील आपल्या अंगणात खेळणाऱ्या सातवर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला.या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.साफिया इकबाल शेख असे जखमी बालिकेचे नाव आहे.

पंडित दीनदयाल वॉर्डातील साफिया शेख ही बालिका अंगणात खेळत होती.हा परिसर कारवा जंगलाला लागून आहे.खेळण्यात दंग असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला.दरम्यान, काही लोकांना बिबट दिसल्याने त्यांनी आरडाओरड केला.आवाजाने बालिकेला सोडून देऊन बिबट्याने जंगलात धूम ठोकली.हल्ल्यात साफिया शेख ही गंभीर जखमी झाली.तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे,वन कर्मचारी कोमल घुगलोत व पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.सदर परिसरात कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले.बल्लारपूर पेपर मिलचा बांबू स्टॉक यार्ड व दीनदयाल वॉर्ड परिसरात सदर बिबट काही दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला.मात्र यावर त्वरित वनविभागाने आळा घालावा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

पदवीधर निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात २६ केंद्रांवर मतदान; १३ हजार ६०८ मतदारांची नोंदणी.. -चार तालुक्यांतील मतदानाच्या वेळेत बदल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील २६ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.जिल्ह्यात १३...

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; उद्याला विधान परिषद निवडणूक मतदान..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा काल बुधवारच्या सायंकाळी थंडावल्या असून उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.नागपूर पदवीधर...

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!