Friday, July 17, 2026
Homeदेसाईगंजकोंढाळा गावामध्ये सुपर बसचा थांबा देण्यात यावा; सामाजिक कार्यकर्ते आशिष ठाकरे यांची...

कोंढाळा गावामध्ये सुपर बसचा थांबा देण्यात यावा; सामाजिक कार्यकर्ते आशिष ठाकरे यांची मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज(कोंढाळा) :- गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ गणविल्या जाणाऱ्या देसाईगंज (वडसा) तालुक्यातील कोंढाळा हे गाव संवेदनशील तसेच यशवंत ग्रामपंचायत म्हणून गणल्या जाणारे एकमेव असे गाव आहे.अशातच गावातील होतकरू तरुण-तरुणी व शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी बरोबरच गावातील सर्वसामान्य नागरिक तालुक्याच्या ठिकाणी दररोज दिवसा ढवळ्या तसेच रात्रीच्या सुमारास अनेक कार्यालय व त्याच बरोबर खाजगी कपड्यांच्या दुकानात तसेच कटलरीच्या दुकानांमध्ये गावातील मुली तसेच महिला वर्ग काम करीत आहेत.अशातच दररोज यांना सुपर बस ऐवजी स्थानिक बसची वाट बघावी लागते.स्थानिक बस नसल्यास यांवर कुठलाही पर्याय नसतो; त्यामुळे अनेकांना कितीतरी वेळा बसची वाट बघून तात्कळत बसावे लागते.यासाठी कोंढाळा गावातील सामाजिक कार्यकर्ते आशिष ठाकरे यांनी कोंढाळा गावातील बस स्थानक प्रवाशी निवाऱ्या नजीक सुपर बसचा थांबा देण्यात यावा; अशी मागणी केली आहे.

सध्याच्या घडीला सर्वसामान्य नागरिक तसेच गोर –  गरीब नागरिकांची मुले-मुली तसेच कामगार बंधू सर्वात जास्त स्थानिक बस ची वाट बघून थकून जाऊन ये-जा करणाऱ्या इतरांना हात दाखवून लिफ्ट मागण्याचा प्रयत्न करीत असतात; अशातच अनेकजण घमंडी पणा दाखवून तसेच दुसऱ्यांना कमी लेखून दुचाकी तसेच चारचाकी वाहन थांबवित नसल्याने; अनेकांचे मन दुखावले जात असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे शासन स्तरावरून सुरू करण्यात आलेल्या स्थानिक बसेच तसेच सुपर बसेचा थांबा इतर गावांसोबतच देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा प्रवाशी निवारा गावामध्ये देण्यात यावा; अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आशिष ठाकरे यांनी केली आहे.अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!