उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- स्वच्छ,सुंदर म्हणविल्या जाणाऱ्या गडचिरोली शहरात स्वच्छतेचे तीन-तेरा होऊन बोजवारा वाजल्याचे दिसून येत आहे.नाल्यांचा उपसा तर झाला मात्र उपसा करण्यात आलेल्या नाल्यातील घाण तसेच कुडा-कचरा कित्तेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला पडून असल्याने वार्डातील तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न नगरपरिषद गडचिरोली तर्फे ऐरणीवर टांगला जात असल्याचे हल्ली दिसून येत आहे.
गडचिरोली शहरातील सर्वोदय वार्डाच्या श्री शंकर-पार्वती मंदिराकडील साईडच्या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.नागरिकांच्या मते, कित्तेक महिने नाल्यांचा उपसा केला जात नाही; अशातच नाल्यांचा उपसा केला तर नाल्यातील घाण बरेच दिवस रत्याच्या कडेला पडून असल्याने याचा वाली कोण? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.नगर परिषद गडचिरोली तर्फे नाली उपसा तसेच कित्तेक कामांचे लाखो रुपयांचे कंत्राट दिले जाते.मात्र एक ‘ना धड भाराभर चिंध्या’ असे हल्ली चित्र निर्माण झाले आहे.अशातच रात्रौच्या सुमारास डास,किडे, मच्छर व इतर कीटकजन्य डासांच्या प्रादुर्भावाने वार्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी नगर परिषद गडचिरोली यांनी खेळू नये व रस्त्याच्या कडेला असलेल्या घाण तसेच काडी-कचऱ्याची लवकरात लवकर उचल करावी; अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

