Thursday, July 16, 2026
Homeदेसाईगंजस्वागतगीताच्या उत्कृष्ठ सादरीकरणासाठी शिवम् थिएटर्सच्या कलावंतांचा विशेष सन्मान…..

स्वागतगीताच्या उत्कृष्ठ सादरीकरणासाठी शिवम् थिएटर्सच्या कलावंतांचा विशेष सन्मान…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गांधीनगर) :- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्रालय व जिल्हा प्रशासनाचे संयुक्त विद्यमाने मूल येथे ३ दिवसीय झाडीपट्टी कला महोत्सव साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे हा महोत्सव झाडीपट्टीमधील कलावंताच्या कलेला वाव मिळावा या हेतूने राज्याचे सांस्कृतिक तथा वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी घडवून आणला.या महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिध्द अभिनेत्री मराठमोळी अप्सरा सोनाली कुलकर्णी आणि संमेलनाध्यक्ष म्हणून पद्मश्री डॉ.परशुराम खुणे उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्वागतगीतातून करण्याची जबाबदारी आयोजक समितीने झाडीपट्टीमधिल एक सुप्रसिद्ध गायक,गितकार,संगितकार युवराज गोंगले यांच्या कडे दिली होती.युवराज गोंगले यांनी हि जबाबदारी उत्तम रित्या पार पाडीत समग्र झाडीपट्टीच दर्शन स्वागतगीतातून घडावं अशी कल्पक आणि सुंदर स्वागतगीताची रचना केली.मान्यवरांच्या स्वागतासाठी रचलेल्या स्वागतगीताचे युवराज गोंगले यांच्या सोबत शिवम् थिएटर्स नागभिड / देसाईगंज(वडसा) च्या कलावंतांनी झाडीपट्टीची सर्वधर्म समावेश अशी वेशभूषा धारण करुन अप्रतिमपणे सादरीकरण केले. सदर स्वागतगीत अस्सल झाडीबोलीत असल्याने उपस्थित मान्यवर,कलावंत आणी प्रेक्षकांनी दाद देत  युवराज गोंगले यांच्यासह शिवम् थिएटर्सच्या कलावंतांचे भरभरुन कौतुक करण्यात आले. झाडीपट्टीतील सर्व समावेशक अशा या स्वागतगीताच्या उत्कृष्ठ सादरीकरणासाठी युवराज गोंगले आणि शिवम् थिएटर्सच्या कलावंतांना पद्मश्री डॉ.परशुराम खुणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी  महोत्सवातील प्रमुख अतिथी असलेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या वक्तव्यात या स्वागतगीताचा विशेष उल्लेख केला व महोत्सवातून रजा घेण्या अगोदर शिवम् थिएटर्सच्या कलावंतांसोबत आवर्जून सेल्फी काढून घेतली. स्वागतगीताच्या सादरीकरण चमू मध्ये शिवम् थिएटर्स नागभीड/वडसा तर्फे युवराज गोंगले, प्रशांत खडसे, मंगेश जांभुळे, प्रणय देवगडे, दिनेश गिऱ्हेपुंजे, पत्रु धारणे, धनराज दुरबूळे, वैभव बोडके, संदिप सुकारे, संदिप टेकाम, निखिल मेश्राम, विजय वाटकर, ममता गोंगले, ऋतू गुरनुले, पल्लवी मेश्राम, आणि स्वाती बोंदरे या कलाकारांचा समावेश होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!