Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीअजब-गजब कारनामा…..!-अवैध दारूची तस्करी चक्क बैलबंडीतून……-गडचिरोली जिल्ह्यातील घटना…

अजब-गजब कारनामा…..!-अवैध दारूची तस्करी चक्क बैलबंडीतून……-गडचिरोली जिल्ह्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

संपादक/मुनिश्वर बोरकर

गडचिरोली :- दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत चारचाकी वाहन तसेच दुचाकी वाहनांचा वापर करून अवैध दारू तस्करी करीत असल्याचे दिसून येत आहे.अशातच आता अवैध दारू तस्करी करणाऱ्यांनी नामी शक्कल लढवित तेलंगणा राज्यातून वैनगंगा नदिपात्रातून चक्क बैलबंडीने दारू तस्करी करीत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तेलंगणा राज्यातून बैलबंडीने दारू तस्करी करणाऱ्या तिन बैलबंडी सहीत चौघांना रंगेहात पकडले.स्थानिक गुन्हे शाखेने सीरोंचा तालुक्यातील टेकडा (ताला) वैनगंगा नदिपात्रातून बामणी मार्ग दारू तस्करी करीत असलेले संदिप दुर्गम, व्यकंटी कोटम,बापू दुर्गम व श्रीनिवास दुर्गम राहणार सर्व टेकडा (ताला) या चार व्यक्तींना बैलबंडी सहीत पकडले.यात बिअर व व्हिस्की च्या ५० बॅक्स होत्या. त्याची अंदाजे किंमत २ लाख ५२ हजार रुपये  एवढी आहे.बामणी पोलिसांनी त्या चौघांनाही पकडून जेरबंद केले.सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक निलोप्पल,अप्पर पोलिस अधिक्षक कुमार चिंता , अप्पर पोलिस अधिक्षक एम. रमेश, पोलिस निरिक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली.तेलंगणा सिमेतून सिरोंचा नदि पुलावरून व नदिपात्रातून अवैध दारूची तस्करी नेहमीच होत असल्याने यावर कुठेतरी आळा घातला जावा; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!