Thursday, July 16, 2026
Homeदेसाईगंजतीन दिवसांपासून शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण सुरू…! प्रशासन गाढ झोपेत…-देसाईगंज...

तीन दिवसांपासून शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण सुरू…! प्रशासन गाढ झोपेत…-देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी बांधवांना जाहीर पाठिंबा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज (गडचिरोली) :- जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या माय बाप शेतकरी बांधवांची एक ना एक दिवस तुम्हाला हाय लागणार आहे; हे नक्कीच..! केवळ तुम्ही आपलीच पोळी शेकून “जिथे मिळते दमडी तिथे खाता कोंबडी”असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.अशातच तुम्ही कितीही ठिय्या आंदोलन वा आमरण उपोषण करून मरून जा…! आम्हाला त्याच्याशी कसलेही देणे-घेणे नसल्याची हल्ली प्रचिती देसाईगंज तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या बाबतीत दिसून येत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी १२ तास कृषी पंपांना वीज पुरवठा करण्यात यावा; यासाठी देसाईगंज तालुक्यातिल कृषी पंपधारकांनी आंदोलन उभारले होते.तेव्हा स्थानिक आमदारांशी चर्चा करुन ३ दिवसात आरमोरी विधानसभा क्षेत्रासह गडचिरोली जिल्ह्यातिल शेतकऱ्यांना सुरळित विज पुरवठा केला जाईल,अशी ग्वाही दिली.परंतु तब्बल १५ दिवस उलटुनही विजपुरवठा होत नसल्याने पिक धोक्यात आल्याने शेकडो शेतकरी भुमिपुत्रांनी सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम यांच्या नेतृत्वात देसाईगंजच्या उपविभागिय कार्यालयावर मोर्चा च्या माध्यमातुन धडक दिली.शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण होईपर्यंत आमरण उपोषणाची सुरुवात कोरेगांवचे शेतकरी श्याम मस्के पाटिल यांनी केली.त्यानुसार दिनांक- २६ फेब्रुवारी २०२४ पासून तालुक्यातील शेतकरी बांधवांचा ठिय्या आंदोलन तसेच श्याम मस्के यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असूनही याकडे कुणीही लक्ष घालीत नसल्याने आज दिनांक – २८ फेब्रुवारी रोजी देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी बांधवांच्या ठिय्या आंदोलन तसेच आमरण उपोषण स्थळी भेट देऊन सदर आंदोलनाची तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार वीजपुरवठा व इतर मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना व उपोषणकर्ता शेतकरी श्याम मस्के यांना दिलासा द्यावा; अशी मागणी करीत सदर शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलन व आमरण उपोषणास बसलेले उपोषणकर्ते शेतकरी श्याम मस्के यांना देसाईगंज तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या चार प्रमुख कल्याणकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!