उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- मूल येथील एका शिक्षकाच्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या तरुणानेच चोरी करून निघून गेला.ही घटना मूल शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये घडली.तक्रारदार शिक्षक राजू जगन चिकाटे हे १३ जानेवारीला कामानिमित्त बाहेर गावी गेले होते.त्याच दिवशी चामोर्शी तालुक्यातील वायगाव येथील त्यांचा नातेवाईक स्नेहल देवगडे त्यांच्या घरी आला.मात्र, घरी कुणीही नसल्याची संधी साधून त्याने मागील कंपाऊंडमधील घरात शिरून चिकाटे यांच्या घरी चोरी केली.चिकाटे घरी परत आले असता त्यांना घरातील साहित्य अस्तव्यस्त दिसले.घरात चोरी झाल्याचे समजताच त्यांनी मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.मूल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. १६ जानेवारी रोजी घरात पाहुणे म्हणून आलेला स्नेहल हा चिकाटे यांच्या घरातून चोरी करणारा चोर निघाला.पोलिसांनी स्नेहल देवगडे यांनी त्याला अटक करून चोरीचा माल जप्त केला.पुढील तपास पोलिस निरीक्षक सुमित पारटेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

