Thursday, September 24, 2026
Homeचंद्रपूरआशिष नागदेवते आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान पुरस्काराने सन्मानित-साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य…

आशिष नागदेवते आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान पुरस्काराने सन्मानित-साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापूर येथील रहिवासी असलेले,विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंक शाखा वडसा चे कर्मचारी तसेच संत कबीर फिल्म प्रोडक्शन नागपूर चित्रपट दिग्दर्शक आशिष अशोक नागदेवते यांना नुकतेच साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातील कार्याकरिता जागतिक स्तरावरील ग्लोबल इंटरनॅशनल फाऊंडेशन टीम दिल्ली द्वारे नागपूर येथे सन्मानित करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी राॅयल गोंडवाना संस्थेचे संचालक नंदलाल चौधरी,ग्लोबल इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मनिषा ठाकरे, महाराष्ट्र विद्यार्थी परिषद अध्यक्षा माधुरी पालीवाल, आमदार नामदेव ससाणे, बाल कल्याण विकास अधिकारी मुस्ताक पठाण यांच्या हस्ते आशिष नागदेवते यांना सन्मानित करण्यात आले. 

ग्लोबल इंटरनॅशनल फाऊंडेशन ही संस्था भारतासह जगभरातील १४ देशांमध्ये कार्यरत आहे.नुकतेच नागपूर येथे संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिना निमित्त सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल साहित्यिक तथा चित्रपट दिग्दर्शक आशिष नागदेवते यांना आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान पुरस्कार २०२३-२४ ने सन्मानित करण्यात आले. सत्कारप्रसंगी आई निलेश्वरी नागदेवते,सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागेश वाहुरवाघ,चित्रपट अभिनेते सुरेंद्र मेश्राम उपस्थित होते.आशिष नागदेवते यांनी मागील दहा वर्षांपासून विविध विषयांवर लेखन केले असून त्यांच्या लेखनातून समाजाला चालना देण्याचे काम केले आहे.तसेच चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा ते दिग्दर्शक व सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत.नुकतेच त्यांची श्रीलंका येथे तयार होणाऱ्या नागेश वाहुरवाघ दिग्दर्शित ‘दी लाॅर्ड बुद्धा’ चित्रपटाकरिता सहायक दिग्दर्शक म्हणून त्यांची निवड झाली आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल नातेवाईक, मित्रमंडळी व राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!