Thursday, September 24, 2026
Homeकुरुडमहिला तलाठी फिरकेना; रेती तस्कर सरकेना...!-कुरूड गावात रेती तस्करांनी लागोपाठ लावल्या हजेऱ्या....

महिला तलाठी फिरकेना; रेती तस्कर सरकेना…!-कुरूड गावात रेती तस्करांनी लागोपाठ लावल्या हजेऱ्या….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

कुरूड(देसाईगंज) :- गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत गणल्या जाणाऱ्या कुरूड गावापासून पश्चिमेस काही अंतरावरील महसूल विभागाचे रेती घाट तसेच रेती चोरट्यांकडून तयार करण्यात आलेल्या नवीन रेती घाटांतून; मोठ्या प्रमाणावर रेती तस्करांनी लागोपाठ अवैध रेतीचा उपसा करून; शासनास लाखो रुपयांचा चुना लावण्याचा सपाटा चालविला आहे.अशातच महिला तलाठी फिरकेना; रेती तस्कर सरकेना…अशी अवस्था निर्माण झाली असल्याने काहीजण मालामाल होऊन लाखो रुपयांची छपाई चोरट्या रेतीच्या माध्यमातून अनेकजण करीत असल्याची चर्चा गावात तसेच तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे.

सध्याच्या घडीला जी मोठी गावे आहेत आणि ज्या ठिकाणी रेती साठा भरपूर प्रमाणात आहे; अशा ठिकाणी महिला तलाठीच कां? असाही सवाल अनेक सुजाण नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.रेती घाटांचे लिलाव झाले नसतांना आमच्या गावातील नदी रेती घाटांमधून बाहेरून कोणत्याही व्यक्तीने वा नागरिकांनी ट्रॅक्टर वा इतर साधनांद्वारे रेती तस्करी करण्यात येऊ नये… ! असा निर्णय घेणारे व बऱ्याच गावातील अवैधरित्या रेती तस्करी करणारे उदयास आले असल्याने अशा रेती तस्करांवर आळा घालणार कोण?असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

काही रेती तस्कर ‘आमचा गांव,आमची चोरटी रेती राज्य’ संकल्पनेची कास धरून अवैधरित्या रेती तस्करीच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत.यामुळे काहीजण मालामाल होऊन लाखो रुपयांची छपाई करीत असल्याचे दिसून येत आहे.खरंतर आमचा गांव आमचे रेती साम्राराज्य म्हणून सर्वसामान्य नागरिकांना भुरड घालून, बाहेर ठिकाणी रेतीचा पुरवठा करून,केवळ पैस्याच्या लालसेपोटी माल सुताओचे काम करतांना हल्ली दिसून येत आहेत.आजच्या घडीला नदीपात्रातील शासनाच्या अखत्याऱ्यातील करोडो रुपये महसूल प्राप्त होणाऱ्या रेती तस्करीला उधाण येऊन शासकीय,निमशासकीय व खाजगी कामांवर लाखो रुपयांची देयके काढून विना वाहतूक परवाना सर्रास व राजरोसपणे यापूर्वी व हल्लीही महसूल बुडविला जातो आहे.अशाचवेळी अधिकारी, कर्मचारी डोळेझाक करून केवळ देखावा करीत आहेत.यांस जबाबदार कोण? असाही सवाल उपस्थित केला जातो आहे.प्रत्येक गावांमध्ये रेती तस्करांनी अवैधरित्या रेती साठवणूक आपल्या स्वमालकीच्या जागेत न ठेवता कुणाच्या खाजगी जागेत,वाड्यात,घराच्या पटांगणात वा इतर ठिकाणी ठेऊन व अशांना नियमित एकमुस्त रकमेची भुरड घालून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न सुरू आहे.यासाठी रेती तस्करांवर आळा घालणे गरजेचे आहे.अन्यथा ‘महिला तलाठी फिरकेना; रेती तस्कर सरकेना’ अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील रिक्त कोतवाल पद भरण्यास शासनाची मान्यता.. – महिला आरक्षण व रिक्त पदे भरण्याकरिता जातीचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी विशेष सभा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,सावंगी व विसोरा गावातील गेल्या अनेक कालावधीपासून रिक्त असलेले कोतवाल(महसुल सेवक)पद भरण्यास शासनाने मान्यता दिली असून संबंधित गावातील...

कृषी विभागातील तब्बल १४ हजार ४४५ तांत्रिक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांना एक दिवसांचे वेतन..

उद्रेक न्युज वृत्त :-निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच शेतकरी बांधवांना फटका सहन करावा लागतो आहे. कधी अवकाळी पाऊस,तर कधी किडीचा प्रादुर्भाव,तर कधी ऐन हंगामात धो-धो पावसामुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!