Monday, August 10, 2026
Homeकुरुडकुरूड येथे सिसी रोड बांधकामासह सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन...

कुरूड येथे सिसी रोड बांधकामासह सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके यांच्या विशेष प्रयत्नातून कुरूड येथे सिसी रोड बांधकामासह सभामंडप बांधकामाचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच भूमिपूजन करण्यात आले.यात कुरूड येथील आंबेडकर चौक याठिकाणी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विकास योजने अंतर्गत १० लक्ष रुपयांचे सभामंडप बांधकाम,तर त्रिलोक गेडाम यांच्या घरापासून ते आको मेश्राम यांच्या घरापर्यंत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाचा विकास करणे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत ५ लक्ष रुपयांचे सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करण्यात येणार आहे.बांधकाम भूमिपूजन प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंचा प्रीती मडावी, ग्राम विकास अधिकारी दामोदर पटले,माजी उपसरपंच क्षितिज उके,ओबीसी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे,ग्रामपंचायत सदस्य विलास पिलारे,पलटू मडावी,गावातील नागरिक पितांबर हुमणे, विलास गोटेफोडे,कमलेश गणवीर,यादव गणवीर, अभय हुमणे,शुभम मेश्राम,अमन बोरकर,रोशन शेंडे,भीमराव घुटके,सारीका क्षितिज उके व बौद्ध समाज बांधव तथा बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!