Sunday, August 9, 2026
Homeकुरुडकुरूड येथे श्री संत गजानन महाराज प्रकटदिनाची यशस्वी सांगता….

कुरूड येथे श्री संत गजानन महाराज प्रकटदिनाची यशस्वी सांगता….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(कुरूड) :- श्री संत गजानन महाराज यांच्या १४६ व्या प्रकट दिनानिमित्त हरी भक्त परायण कुमारी लीनाताई बागडे महाराज शहापूर यांच्या मधुर वाणीतून सात दिवस सप्ताह कार्यक्रम श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थान पाटील पुरा कुरुड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

काल,३ मार्च रोजी गोपाल काल्यानिमित्त कीर्तनाचा अनेक मान्यवर मंडळींनी लाभ घेतला.सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून कुरुड ग्रामपंचायतीच्या सरपंचा प्रशाला अविनाश गेडाम यांच्या शुभहस्ते भागवतकार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.सत्कार समारंभ प्रसंगी काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते परसराम टिकले,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामदास मसराम,ओबीसी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव मनोज ढोरे,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख  अविनाश भाऊ गेडाम, काँग्रेस नेते मनोहर निमजे, काँग्रेस नेते विजय कुंभलवार,राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव विलास गोटेफोडे,तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्ष महादेवराव ढोरे आदी उपस्थित होते.भागवत सप्ताह यशस्वीतेकरिता गजानन महाराज देवस्थान समिती अध्यक्ष नवलाजी राऊत,दीपक चौधरी,मुकुल लाभे,लंकेश बेदरे,निखिल बेदरे,दिनेश ठाकरे, विनायक बुल्ले, विलास ठाकरे, शामराव ढोरे, देवदास पिलारे, शंकर ढोरे, मधुकर लाभे महाराज, अशोक कुथे,बाजीराव भागडकर,रामचंद्र कार, हेमराज ठाकरे,सचिन ढोरे,सचिन ठाकरे,सोमेश्वर दिवटे,अजय राऊत आणि पाटील मोहल्यातील समस्त भाविक भक्तांनी विशेष सहकार्य करीत कार्यक्रम यशस्वी केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची साडेसात लाखांची फसवणूक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका अज्ञात सायबर चोरट्याने ऑनलाईन केवायसीच्या नावाखाली डॉक्टरची तब्बल साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. डॉ.राघवेंद्र...

एकेकाळी ज्या भागात फडकायचे लाल,काळे झेंडे; आता पहिल्यांदाच फडकणार तिरंगा..

उद्रेक न्युज वृत्त :-देशातील नक्षलवादाची संपूर्ण मुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत उपटून फेकण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर करताच राज्याच्या विविध जिल्ह्यातील...

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!