Friday, September 25, 2026
Homeगडचिरोलीयांचेच दात अन् यांचेच ओठ..!-शेतकरी बांधवांच्या जीवावर उठेलेल्या निष्ठुर  सरकारच्या निषेधार्थ गावोगावी...

यांचेच दात अन् यांचेच ओठ..!-शेतकरी बांधवांच्या जीवावर उठेलेल्या निष्ठुर  सरकारच्या निषेधार्थ गावोगावी मुर्दाबादचे  लावणार नारे…-छगन शेडमाके जिल्हाध्यक्ष,असंघटित कामगार सेल, काँग्रेस

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणारे शेतकरी बांधव रात्रंदिवस पोटाची खडगी भरण्यासाठी जीवाचे रान करून कधी तुडतुडा,कधी रानटी जनावरांच्या हैदोषांवर मात करीत शेतात पिके उभी करतात; कित्तेक ठिकाणी सिंचनाची सोय नसलेले शेतकरी कृषी पंपाच्या माध्यमातुन रब्बी पिकाची लागवड करतात.मागिल दोन वर्षापासुन देसाईगंज तालुक्यात कृषिपंपांना विजपुरवठ्याचा प्रश्न सातत्याने निर्माण झाला असुन सुरळित पाणिपुरवठा होत नसल्याने धान पिक धोक्यात येवुन करपण्याच्या मार्गावर लागले आहे.अशातच देसाईगंज तालुक्यातील शेतकरी बांधवांनी २६ फेब्रुवारी २०२४ पासून कृषिपंपांना १२ तास वीज पुरवठा करण्यात यावा; यासाठी उपविभागीय कार्यालय देसाईगंज याठिकाणी आंदोलन तसेच आमरण उपोषणाचा पावित्रा घेतला आहे.त्यानुसार आजचा आठवा दिवस सुरू असून शेतकरी बांधवांच्या विविध मागण्या कां पूर्ण करण्यात येत नाहीत.राज्य सरकारचे खरे सूत्रधार असलेले उपमुख्यमंत्री यांचे,ऊर्जा खात्याचे मंत्री यांचे, पालकमंत्रीही यांचेच,एवढेच नाही तर खासदार,आमदारही यांचेच.तरीही देसाईगंज तालुक्यातील शेतकरी वाऱ्यावर का? पाण्याअभावी अर्धमेल्या झालेल्या पिकांचा बळी घेण्याचे पाप कोण करीत आहे? आता हातातून पीक गेले म्हणून बळीराजाने आत्महत्या करावी; याची वाट हे निष्ठूर सरकार पाहात आहे का? शेतकरी बांधवांच्या जीवावर उठेलेल्या निष्ठुर सरकारच्या निषेधार्थ गावोगावी जाऊन मुर्दाड भाजप सरकारचा जाहीर निषेध करणार असल्याचे असंघटित कामगार सेल,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!