Wednesday, May 27, 2026
Homeदेसाईगंजउद्याला बोडधा येथे मोफत होमिओपॅथिक आरोग्य शिबिराचे आयोजन…-बनसोड हॉस्पिटल देसाईगंजचे उपक्रम…तज्ञ डॉक्टर...

उद्याला बोडधा येथे मोफत होमिओपॅथिक आरोग्य शिबिराचे आयोजन…-बनसोड हॉस्पिटल देसाईगंजचे उपक्रम…तज्ञ डॉक्टर श्रीकांत बनसोड यांची प्रमुख उपस्थिती 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- श्री.दत्त जयंती दिनाचे औचित्य साधून उद्या दिनांक- २६ डिसेंबर रोजी दत्त सांप्रदायिक मंडळ बोडधा ग्रामपंचायत कार्यालय तसेच देसाईगंज बनसोड हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने भव्य होमिओपॅथिक चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आला आहे.

सदर आरोग्य शिबिरामध्ये अनेक जुना व्याधींवर मार्गदर्शन व उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टर श्रीकांत रामजी बनसोड हे स्वतः उपस्थित राहणार असून औषधोपचार करणार आहेत.होमिओपॅथी औषधाचा वापर करून अनेक जुनाट व्याधींवर कायमस्वरूपी फायदा करून घेण्यासाठी देसाईगंज तालुक्यातील सर्व रुग्ण बांधवांना आरोग्य शिबिरात प्रामुख्याने उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुध्दा श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने आरोग्य शिबिरासारखे अत्यंत उपयुक्त असे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी देसाईगंज बनसोड हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर श्रीकांत रामजी बनसोड तसेच हॉस्पिटलातील मान्यवर प्रयत्नशील असतात; 

सदर शिबिराचे आयोजन दत्त सांप्रदायिक मंडळ बोडधाचे अध्यक्ष विलास पाटील गायकवाड,सचिव पुष्पराज पाटील गायकवाड, सरपंचा भाग्यश्री गायकवाड,उपसरपंच राजू पाटील गायकवाड तसेच समस्त ग्राम पंचायत सदस्य यांनी केले असून गावकरी मंडळीचे मोठया प्रमाणात योगदान लाभणार आहे. शिबिरास्त्व लागणाऱ्या औषधीसाठा नागपूर येथील प्रसिद्ध औषधी निर्माण कंपनी शिमराज होमीओ क्यूआर लॅब नागपुरने देवू करून सामाजिक उपक्रमात अग्रगण्य असल्याचे म्हटले आहे.प्रतिष्ठित नागरिक होमराज पाटील गायकवाड,डॉ.मण्डल,माजी सरपंच उद्धव पाटील गायकवाड यांनी शिबिराचे लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे.शिबिरासाठी नोंदणी सुरू असून होमराज पाटील गायकवाड यांच्यशी संपर्क साधावा असेही आवाहन बनसोड हॉस्पिटल देसाईगंज तर्फे करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!