उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात अनेक रेती तस्कर निर्माण झाले आहेत.अशातच प्रशासनाच्या आशीर्वादाने नद्याचे पात्र पोखरून टाकण्यात येत आहे.त्यामुळे लाखोंचा महसूल चोरीला जात आहे.देसाईगंज तालुक्यातील अनेक रेतीघाट तस्करांनी पोखरून काढले आहेत. रात्रभर यंत्र तसेच चोरटे मजुरांच्या साहाय्याने रेती काढणे सुरू असतांना अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.दिवसागणिक तस्करांच्या टोळ्या वाढतच आहेत.मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेतीचे उत्खनन सुरू आहे.अधिकारी व कर्माचाऱ्यांच्या आशीर्वादाने रेती तस्करी सुरू असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.देसाईगंज तालुक्यातील काही भागात उत्तम दर्जाची रेती साठा आहे.नद्यांमधून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करून देसाईगंज तसेच इतरत्र रेतीची वाहतूक होतांना दिसत आहे.रेती तस्कर खुलेआम रेतीची वाहतूक करतात.घाटाशेजारी हजारो ब्रास रेती साठा रात्रभरात जमा होतो आणि अचानक गायब होतो.पुन्हा आठवडा भरात रेतीचे ढिगारे जसेच्या तसे दिसून येतात.अनेक माणसे घाटापासून ते तालुक्यापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नजर ठेऊन असतात.रेती घाटाकडे सामान्य नागरिक शेताकडे जातांना आढळल्यास त्यांना घेराव घालून चौकशी करतात व त्यांना दम देण्याचा प्रकार हल्ली निदर्शनास येऊ लागला आहे.स्थानिक तसेच तालुक्यातील अधिकारी कर्माचाऱ्यांना जाग येणार की नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.

