उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- चिमुर तालुक्यातील बोडदा येथील हनुमान मंदिर परिसरासमोरील नाल्यात मृत नवजात अर्भक बुधवार दिनांक-१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास काही नागरिकांना आढळून आले.याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली.त्यानुसार घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी नवजात अर्भक ताब्यात घेतले.मृत अर्भक; बालिका असल्याने याप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू होता. त्यानुसार पोलिसांनी नवजात अर्भकाच्या मातेचा शोध घेऊन तिची चौकशी केली.अनैतिक संबंधातून झालेल्या नवजात बाळामुळे गावात व समाजात बदनामी होईल; या भितीने अर्भकाला नाल्यात फेकून दिल्याची कबुली मातेने दिली तसेच तिने दिलेल्या माहितीवरून अर्भकाच्या मृत्यूप्रकरणी गावातील मोहीत मोहनलाल नागोसे वय २१ वर्षे युवकास पोलिसांनी आज दिनांक – ७ नोव्हेंबर रोजी अटक केली आहे.

