Saturday, October 17, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा आविका संस्थेवर सावकार गट प्रणित शेतकरी एकता पॅनलचा दणदणीत विजय..

कुरखेडा आविका संस्थेवर सावकार गट प्रणित शेतकरी एकता पॅनलचा दणदणीत विजय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा :- तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणारी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडा येथील सार्वत्रिक निवडणूकीत १३ पैकी ११ जागेवर सावकार गट प्रणीत शेतकरी एकता पॅनलने, कांग्रेस समर्थित परिवर्तन पॅनलचा धुवा उडवून एकतर्फी विजय मीळवत‌ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर वर्चस्व कायम केले.

काल सोमवार ६ नोव्हेंबर रोजी कुरखेडा आविका संस्था येथे सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर नंतर  मतमोजणीला सुरुवात झाली असता विजयांची उत्सुकता दोन्ही पॅनलला लागली असताना मतदान प्रक्रिया अत्यंत चूरशीची ठरलेल्या या निवडणूकीत  कांग्रेस प्रणीत परिवर्तन पॅनलचे  सुफडासाफ करित  शेतकरी एकता पॅनलनी विजयाचा गुलाल उधळला.

यावेळी विजयाचे शिल्पकार ठरणारे सहकार जेष्ठ नेते वसंतराव मेक्षाम, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेचे संचालक खेमनाथ डोंगरवार, भाजपा तालुका अध्यक्ष पुर्व आविकाचे उपसभापती चांगदेव फाये  यांचा नेतृत्वात शेतकरी एकता पॅनलचे  विजयी उमेदवार चांगदेव फाये, अँड . उमेश वालदे,पुंडलिक नागपूरकर महाराज शालिक मेक्षाम,बाबुराव तुलावी,तानाजी उईके, काशीनाथ पुडो, यमुना मडावी, सोनाबाई मडावी, यमुना कचलाम या उमेदवारानी दणदणीत विजय मीळविला तर प्रतिस्पर्धी  काग्रेस गटाचे फक्त पुंडलिक निपाने व चिंतामण जुमनाके यानाच विजय मीळविता आला.यावेळी शेतकरी एकता पॅनलचे विजयी उमेदवार यांचे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये , माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक  दोषहरराव फाये यांच्या वतीने त्यांचा स्वागत करण्यात आला.

 यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी श्रेणी १ सूशील वानखेडे यानी जबाबदारी पार पाडली.शेतकरी एकता पॅनल च्या विजयात सहकार जेष्ठ नेते वसंतराव मेश्राम,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे  संचालक खेमनाथ डोंगरवार, ओबीसी नेते रविंद्र गोटेफोडे, भाजपा शहर अध्यक्ष सागर निरंकारी, नगरसेवक रामभाऊ वैध,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोनेश मेश्राम, उल्हास देशमुख, राहूल गिरडकर कार्यकर्ते  यानी सहकार्य केले.विजयी उमेदवारांनी सर्व मतादारांचे आभार मानले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!