Thursday, June 4, 2026
Homeगडचिरोलीऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईचे सावट…

ऐन दिवाळीच्या तोंडावर महागाईचे सावट…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- दिवाळी अगदी तोंडावर आली आहे.यामुळे सर्व घराघरांमध्ये लगबग सुरू झाली आहे.फराळाची तयारी सुरू झाली असून किराणा साहित्य आणण्यासाठी नागरिक बाजारात गर्दी करू लागले आहेत.असे असले तरी यंदा मात्र दिवाळीच्या उत्साहाला महागाईची झळ बसली आहे.विशेषतः खुसखुशीत,चमचमीत खमंग फराळाला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.मैदा,रवा, साखर,गूळ,पोहे,तेल,खोबरे,बेसन यासह तूप या सर्वच वस्तूंचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांची गोची होत आहे.ऐन सणासुदीत वाढत्या महागाईने डोके वर काढले.तथापि,दिवाळी सारखा सण असल्याने त्यांना प्राप्त परिस्थितीत कसातरी सण साजरा करावा लागेल. दरवर्षी दिवाळी आली की गृहिणी अधिक तयारी करतात ती फराळाची.लाडू,करंजी,अनारसे,चकली,चिवडा,शंकरपाळ्या असे अनेक पदार्थ घरोघरी बनवले जातात.म्हणूनच दिवाळी जवळ आली की सर्वांच्या घरातून खमंग सुगंध दरवळण्यास सुरुवात होते.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फराळ बनविण्यासाठी लागणारे साहित्य १५ ते २० टक्क्यांनी अधिक महागले आहे.ऐन दिवाळीत वाढलेल्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहरम उत्सव तसेच माओवादी संघटनेच्या टी.सी.ओ.सी.(TCOC)कालावधीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७...

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!